Hunan fireworks factory explosion 2026 Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: फटाका कारखान्यात मोठा स्फोट; 21 जणांचा मृत्यू, 61 जण गंभीर जखमी; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Hunan fireworks factory explosion 2026: चीनमधील हुनान प्रांतातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Sameer Amunekar

चीनमधील हुनान प्रांतातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, एका फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात ६१ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लियुयांग शहरातील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

घटनेचा थरार चीनमधील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हुनान प्रांतातील लियुयांग शहरात असलेल्या 'लियुयांग हुआशेंग आतिशबाजी निर्माण' कंपनीत सोमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. गुआंडू टाऊनशिपमध्ये असलेल्या या कारखान्यात अचानक आग लागली आणि त्याचे रूपांतर मोठ्या स्फोटात झाले.

मदत आणि बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सध्या तिथे ५०० हून अधिक बचावकर्मी तैनात असून मदतकार्य वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेत २१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ६१ जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बचावकार्यात कोणतीही हयगय होऊ नये आणि पुढील धोका टाळण्यासाठी तीन आधुनिक रोबोट्सची मदत घेतली जात आहे. हे रोबोट्स ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.

सुरक्षेसाठी स्थलांतर

कारखान्याच्या आवारात दारूगोळ्याची दोन मोठी कोठारे (गोदामे) आहेत. या गोदामांना आग लागल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, हे लक्षात घेऊन प्रशासनाने परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी अग्निशमन दलाने परिसरात पाण्याचा फवारा मारून ओलावा निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे, जेणेकरून उष्णतेमुळे पुन्हा स्फोट होऊ नयेत.

तपासाची चक्रे फिरली स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. कंपनीच्या जबाबदार व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. चीनमध्ये यापूर्वीही चंद्र नववर्षाच्या काळात फटाका दुकानांमध्ये मोठे स्फोट झाले होते, त्यामुळे वारंवार होणाऱ्या अशा अपघातांनी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT