Goa Crime: लाथाबुक्क्यांच्या मारहाणीत बरगड्या मोडल्या, कुचेलीत बारमधील किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट; सुभाष नाईक यांचा खून

Kucheli Bar Murder Case: कुचेली येथील एका बारमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन ६१ वर्षीय सुभाष नाईक यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
Kucheli Bar Murder Case
Goa CrimeDainiak Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कुचेली येथील एका बारमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन ६१ वर्षीय सुभाष नाईक यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत, दोन संशयितांना अटक केली. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. रविवारी फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी क्राइम सीन (तपास) केला.

प्राप्त माहितीनुसार, मृत सुभाष नाईक कुचेली येथील संशयित ॲरॉन फर्नांडिस याच्या बारमध्ये गेले होते. तिथे संशयितांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान अमानुष मारहाणीत झाले. संशयितांनी नाईक यांना लाथाबुक्क्यांनी, हाताने गंभीर मारहाण केली होती, असे तपासात समोर आले आहे. नाईक हे अधून-मधून या बारमध्ये जायचे. दरम्यान, या अचानक चिथावणीला नेमके कारण काय, याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही, त्यामुळे नेमके वादाचे कारण समजू शकलेले नाही.

Kucheli Bar Murder Case
Goa Murder Case: कौले ठेवण्याच्या कारणावरुन कुऱ्हाडीचे मानेवर सपासप वार, दोन भावांच्या हल्ल्यात काकाचा तडफडून मृत्यू; खाजोर्डा हादरले!

कालांतराने, नाईक यांना घरी गेल्यावर बरे वाटत नसल्याने, कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी नाईक यांना बारमध्ये मारहाण झाल्याचा तीव्र संशय व्यक्त केला. ग्रामस्थांच्या पाठिंब्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. परिणामी, नाईक यांची अंत्ययात्रा मध्येच थांबवून, त्यांचे शव हे गोमेकॉत विच्छेदनास पाठवले होते. अहवालात नाईक यांच्या बरगड्या, कणा मोडल्याचे समोर आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
Nashik Live In Partner Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com