China Foreign Minister Qin Gang Dainik Gomantak
ग्लोबल

China Foreign Minister Qin Gang: आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ, चीनचे परराष्ट्र मंत्री तीन आठवड्यांपासून 'बेपत्ता'

China Foreign Minister Qin Gang: चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री चिन गांग गायब झाले आहेत.

Manish Jadhav

China Foreign Minister Qin Gang: चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री चिन गांग गायब झाले आहेत. तीन आठवड्यांपासून ते गायब असल्याचे सांगितले जात आहे. चीनमध्ये राजनैतिक हालचाली वाढल्या असताना चीनचे परराष्ट्र मंत्री 'गायब' झाले आहेत.

दुसरीकडे, अमेरिकेचे राजनयिक जॉन केरी हवामान संकटावर चर्चा करण्यासाठी बीजिंगमध्ये पोहोचले आहेत. मात्र चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

प्रत्येकजण विचारत आहे की, चिन गांग कुठे आहेत? चिन गांग चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे जवळचे आणि विश्वासू मानले जातात.

दरम्यान, चिन गांग यांनी चीनचे परराष्ट्र मंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी अमेरिकेचे राजदूत म्हणूनही काम केले आहे. त्यांना अमेरिकन घडामोडींचे सखोल ज्ञान आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी चीन-अमेरिका संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.

उभय देशांमधील तणावपूर्ण संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांनी जूनच्या मध्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांची भेट घेतली होती. त्यानंतर 25 जून रोजी गांग यांनी श्रीलंका, व्हिएतनाम आणि रशियाच्या (Russia) अधिकाऱ्यांची भेट घेतली, परंतु त्यानंतर त्यांना कोणीही पाहिले नाही.

परराष्ट्र मंत्रालयालाही माहिती नाही की गांग कुठे आहेत?

चीन हा असा देश आहे, जिथे राजकारणातील बहुतांश गोष्टी पडद्याआड घडतात. सोमवारी चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यालाही विचारण्यात आले की, चिनी परराष्ट्र मंत्री बऱ्याच दिवसांपासून कुठे गायब आहेत, त्यांना कोणी पाहिले नाही? यावर प्रवक्त्याने सांगितले की, गांग यांच्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती नाही.

दुसरीकडे, गांग या महिन्याच्या शेवटी युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांना भेटणार होते. मात्र आता 'भेटायला वेळ नाही' असे सांगून बैठकीच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

चिन गेल्या आठवड्यात इंडोनेशियामध्ये आसियान देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार होते. पण ते इथूनही अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या जागी चीनचे राजनयिक अधिकारी वांग यी त्यात सामील झाले.

चिन गांग कुठे असू शकतात?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितले की परराष्ट्र मंत्र्यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे ते आसियान बैठकीत सहभागी झाले नाहीत. परंतु जेव्हा मंत्रालयाच्या वेबसाइटवर त्या दिवसाच्या ब्रीफिंगचे ठळक मुद्दे पाहिले गेले तेव्हा गांग यांच्या हेल्थ अपडेटविषयी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख नव्हता. वास्तविक, चीनमध्ये त्या गोष्टी ब्रीफिंगमधून काढून टाकल्या जातात, ज्या संवेदनशील मानल्या जातात.

चिन गांग यांची तब्येत बिघडली असेल, तर त्यांच्यावर उपचार केले जाण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना गायब करण्याचा चीनमध्ये (China) वाईट रेकॉर्ड आहे. अशा परिस्थितीत गांग यांचे चिनी राष्ट्राध्यक्षांशी काही मुद्द्यावरुन मतभेद असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT