China Coal Mine Blast Dainik Gomantak
ग्लोबल

China Coal Mine Blast: चीनमधील कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट; 82 कामगारांचा होरपळून मृत्यू

China Coal Mine Blast Shanxi: उत्तर चीनमधील शांक्सी प्रांतातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

China Coal Mine Blast Shanxi: उत्तर चीनमधील शांक्सी प्रांतातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली. येथील पिंगयाओ काउंटीमध्ये असलेल्या एका कोळशाच्या खाणीत अचानक भीषण गॅस स्फोट झाला. हा धमाका इतका जबरदस्त होता की, खाणीच्या आत काम करणाऱ्या 82 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य मजूर या दुर्घटनेत गंभीररीत्या भाजले.

स्थानिक प्रशासन आणि कोळसा खाण सुरक्षा ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा भीषण गॅस स्फोट झाला, त्यावेळी जमिनीच्या खाली खाणीमध्ये एकूण 247 कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते. अचानक झालेल्या या स्फोटामुळे खाणीच्या आत काम करणाऱ्या 200 मजुरांना तिथून बाहेर काढण्यात आले.

तथापि, या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आणि धावपळ सुरु झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने मोठ्या संख्येने बचाव पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. खाणीच्या आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवण्यात आली.

अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता खाणीच्या आत अडकलेल्या सर्व प्रभावित लोकांना बाहेर काढण्यात आले असून, बचाव मोहीम अधिकृतपणे पूर्ण झाली.

या दुर्घटनेत जे कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ वैद्यकीय पथकाद्वारे उपचार सुरु आहेत. या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक अपघातावर स्थानिक प्रशासनाने आणि सरकारने दुःख व्यक्त केले.

दरम्यान, खाणीच्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले गेले होते की नाही, आणि खाणीच्या आत नेमका हा गॅस विस्फोट कोणत्या कारणामुळे झाला, याचा अचूक शोध घेण्यासाठी स्थानिक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे चीनमधील (China) खाण कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT