
नवी दिल्ली: भारताने आपल्या एका शत्रू देशाला म्हणजेच पाकिस्तानला धडा शिकवला असून आता चीन आणि तुर्कीवर मोठी कारवाई केली आहे. भारत सरकराने चीनचे ग्लोबल टाईम्स ब्लॉक केले आहे. भारत सरकारने सोशल मीडियावरील चीनचे ग्लोबल टाईम्स अकाउंट बंद केले आहे.
यामागचे कारण म्हणजे, ग्लोबल टाईम्सने भारताविरुद्ध खोट्या बातम्या पसरवण्याचा या भागावातच कारवाई करण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्स हे चीनचे मुखपत्र आहे. हे मुखपत्र चीनचे अध्यक्ष शी जिपिंग यांच्या अजेंडानुसार कार्य करत. ग्लोबल टाईम्सने भारताविरोधात खोट्या बातम्या पसरवल्या असे सांगण्यात येत आहे.
ग्लोबल टाईम्सवरील कारवाईपूर्वी भारताने अरुणाचल प्रदेशाबद्दल चीनच्या दृष्ट हेतूही स्पष्ट केला. तसेच भारताने चीनचे एक्स न्यूज चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अकाऊंट देखील भारतामध्ये बॅन केले आहे. अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनने प्रयत्न केला, परंतु भारताने याला स्पष्टपणे नकार दिला आहे.
भारताने स्पष्ट शब्दात सांगितले की, चीनचा हा प्रयत्न हास्यास्पद आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल हे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. दुसरीकडे, तुर्कीवरही भारताने कारवाइ करताना आपल्या देशातील पर्यटक न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ट्रॅव्हल एजेन्सींना मोठे नुकसान झाले आहे.
तुर्कीचा पाकला उघड पाठिंबा
तुर्की पाकिस्तानचा समर्थक "ऑपरेशन सिंदूर" दरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील तणाव वाढला. ऑपरेशन सिंदूर ७-८ मे २०२५ च्या रात्री सुरू झाले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्डूयांवर हल्ला करण्यासाठी ही कारवाई झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.