US China Trade: डोनाल्ड ट्रम्प, जिनपिंग यांच्यात होणार मिटिंग? आयातशुल्क निर्णय 90 दिवस लांबणीवर; वाद टळला

US import duty on China: आयातशुल्कवाढीनंतर अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध भडकले होते. मात्र त्यामुळे दोन्ही देशांना तोटा होऊ लागल्याने अमेरिकेने या वादाला स्थगिती दिली होती.
Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

वॉशिंग्टन: रशियाकडून तेलखरेदी करत असल्याबद्दल भारतावर अतिरिक्त आयातशुल्क लागू करणाऱ्या अमेरिकेने चीनवरील आयातशुल्क अंमलबजावणीला दिलेल्या स्थगितीला आणखी ९० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेत अमेरिकेला तोडीस तोड उत्तर देऊ शकणाऱ्या चीनशी होणारा संभाव्य वाद टाळला आहे.

आयातशुल्कवाढीनंतर अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध भडकले होते. मात्र त्यामुळे दोन्ही देशांना तोटा होऊ लागल्याने अमेरिकेने या वादाला स्थगिती दिली होती. या स्थगितीची मुदत आज संपत असतानाच ट्रम्प यांनी ही स्थगिती आणखी ९० दिवसांसाठी वाढविली आहे.

ट्रम्प यांनी या मुदतवाढीच्या कार्यकारी आदेशावर सही केली आहे. स्थगितीच्या सध्याच्या काळातील सर्व नियम पुढील तीन महिन्यांतही कायम असतील, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून माहिती देताना सांगितले आहे. अमेरिकेने चीनवर ३० टक्के आयातशुल्क लागू केले आहे. ट्रम्प यांनी आज मुदतवाढ दिली नसती तर याहून अधिक शुल्क लागू केले गेले असते आणि त्याला प्रत्युत्तर देताना चीनकडूनही मोठ्या प्रमाणात आयातशुल्क वाढ झाली असती.

Donald Trump
Trump Tariffs India: ट्रम्प यांचा पुन्हा भारताला धक्का, आणखी 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची केली घोषणा

आयातशुल्कावरून आणि व्यापार करारावरून अमेरिका आणि चीनमध्ये अद्यापही वाद आहेत. शुल्कवाढीला स्थगिती मिळाल्यामुळे या देशांना वाद मिटविण्यासाठी वेळ मिळणार असल्याचे येथील माध्यमांनी म्हटले आहे.

Donald Trump
Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात येत्या काही आठवड्यांत चर्चा होणार असून त्यावेळी तणाव नको, म्हणूनही ही स्थगिती मिळाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चीनबरोबर व्यवसाय करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com