Lin Jian Dainik Gomantak
ग्लोबल

India-China Relations: ''अरुणाचल प्रदेशवर भारताने बेकायदेशीर कब्जा केला, आम्ही त्याला...'' चीनने पुन्हा ओकली गरळ!

India-China: भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद पुन्हा चिघळू लागला आहे. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगत आला आहे.

Manish Jadhav

India-China Relations:

भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद पुन्हा चिघळू लागला आहे. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगत आला आहे. आता पुन्हा एकदा चीनने गरळ ओकली आहे. भारत ज्याला अरुणाचल प्रदेश म्हणतो ते जंगनान क्षेत्र असल्याचे चीनने म्हटले आहे. जंगनान हा आपल्या देशाचा अविभाज्य भूभाग असल्याचा दावा चीनी राज्यकर्ते सातत्याने करत आहेत. भारताने या भागावर बेकायदेशीररित्या कब्जा केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सोमवारी ही माहिती दिली. भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांच्या नुकत्याच आलेल्या वक्तव्यानंतर लिन यांनी हे वक्तव्य केले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा महत्त्वाचा भाग असून चीनचा दावा पूर्णपणे निराधार आणि खोटा असल्याचे जयशंकर म्हणाले होते.

लिन जियान म्हणाले की, "1987 मध्ये भारताने चीनचा भूभाग बळकावला आणि तथाकथित अरुणाचल प्रदेशची स्थापना केली. हा संपूर्ण भाग बेकायदेशीररित्या भारताच्या ताब्यात आहे. त्यावेळीही चीनने त्याविरोधात तात्काळ निवेदन जारी केले होते. चीनने ठोसपणे सांगितले होते की, ''भारताची ही कारवाई बेकायदेशीर आणि अवैध होती. आजही या मुद्यावर बीजिंगची भूमिका कायम आहे.''

"भारत-चीन सीमेचा निर्णय झालेला नाही"

लिन म्हणाले की, भारताच्या अवैध कब्जाआधी अरुणाचल नेहमीच चीनचा भाग होता. भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा कधीच ठरलेली नाही, असेही ते म्हणाले. एका महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगण्याची ही चौथी वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 मार्च रोजी अरुणाचल प्रदेश दौऱ्यानंतर बीजिंगने आपला निषेध व्यक्त केला होता आणि भारताने अशी पावले टाळावीत, असे म्हटले होते.

दुसरीकडे, अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. आपला दावा बळकट करण्यासाठी चीनने भारतीय नेत्यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यांवर आक्षेप घेणे सुरुच ठेवले आहे. दरम्यान, चीनचे दावे भारताकडून सातत्याने फेटाळले जात आहेत. यावेळीही पीएम मोदींच्या अरुणाचल दौऱ्यानंतर चीनकडून आक्षेप घेण्यात आला. यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचा हा दावा बेताल ठरवून फेटाळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

GCA Premier League: दर्शन, गौरेश, फेलिक्स यांचे झुंझार प्रयत्न अखेर अपुरे; धेंपो क्लबला गतविजेत्या चौगुले संघाविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांची आघाडी

IPL 2026 Points Table: टायटन्सची चालली जादू! कोलकात्याला हरवून गुजरातनं गुणतालिकेत केला उलटफेर; हैदराबाद आणि दिल्लीला फटका

SCROLL FOR NEXT