India-China Relations: नेहरु की पटेल, चीनबाबत मोदी सरकार कोणाच्या मार्गावर आहे? जयशंकर स्पष्टच बोलले

India-China Relations: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर निशाणा साधला.
External Affairs Minister S Jaishankar
External Affairs Minister S JaishankarDainik Gomantak
Published on
Updated on

India-China Relations: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुन्हा एकदा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर निशाणा साधला. जयशकंर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांमध्ये चीनबरोबरच्या संबंधात खूप उदारता दाखवण्यात आली. चीनसोबतच्या चर्चेत नेहरुंनी आदर्शवादाला महत्त्व दिल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. त्याचवेळी, मोदी सरकार वास्तव डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. माओ झेडोंगच्या चीनशी कसे संबंध निर्माण करायचे यावर नेहरु आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद असल्याचेही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. जयशंकर पुढे म्हणाले की, मोदी सरकारचा चीनशी व्यवहार करताना सरदार पटेल यांच्या पद्धतीवर विश्वास आहे.

नेहरुंवर प्रश्न उपस्थित केले

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, जर तुम्ही देशाच्या 75 वर्षांच्या परराष्ट्र धोरणावर नजर टाकली तर चीनबाबत वास्तववादात खूप तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव पहिल्या दिवसापासून होता, जेव्हा नेहरु आणि पटेल यांचे चीनला उत्तर कसे द्यावे यावर एकमत होऊ शकले नाही. याशिवाय, सुरक्षा परिषदेची सीट चीनला देण्याच्या नेहरुंच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

External Affairs Minister S Jaishankar
S Jaishankar On Canada: 'उलटा चोर कोतवाल को डांटे..."! एस जयशंकर यांनी काढले कॅनडा सरकारचे वाभाडे

परस्पर संमती आवश्यक

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की भारत चीनकडून नेहमीच माइंड गेममध्ये हरला आहे का? यावर जयशंकर म्हणाले की, मला वाटत नाही की आपण नेहमीच हरलो आहोत. पण काही बाबतीत बोलायचे झाल्यास आज समजणे थोडे अवघड आहे. पंचशील करार हे असेच एक उदाहरण असल्याचे ते म्हणाले. पूर्व लडाखमधील चीनच्या आक्रमकतेबाबत भारताच्या कठोर भूमिकेचा संदर्भ देत ते म्हणाले की, भारताने चीनकडे लक्ष दिलेले नाही. आम्ही परस्पर संमतीवर आधारित संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत ही परस्परता ओळखली जात नाही, तोपर्यंत या संबंधातील प्रगती कठीण होईल. आमच्या समस्या आहेत कारण 2020 मध्ये करारांकडे दुर्लक्ष केले गेले. चीनशी संबंध कसे असतील हे चीनच्या धोरणावर बरेच अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com