Canada's Transport Minister Pablo Rodriguez Dainik Gomantak
ग्लोबल

Canada: दहशतवादी पन्नूच्या धमकीवर कॅनडाची मोठी कारवाई; मंत्री म्हणाले, ''लोकांनी घाबरु नये...''

Manish Jadhav

Canada Minister Raction Over SFJ Chief Pannu Threat: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. कॅनडाने कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे, कॅनडाचे वाहतूक मंत्री पाब्लो रॉड्रिग्ज यांचे वक्तव्यही समोर आले आहे.

ओटावा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. आम्ही प्रत्येक धोक्याला गांभीर्याने घेतो, विशेषत: जेव्हा त्यात एअरलाइनचा समावेश असतो.

एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिली

दरम्यान, 4 नोव्हेंबरला खलिस्तान समर्थक नेते गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडिओ जारी केला होता आणि धमकी दिली होती की, '19 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या (Air India) फ्लाइटमध्ये लोकांनी प्रवास करु नये, कारण एअर इंडियाचे फ्लाइट उडवून दिले जाईल.'

शीखांना संबोधित करताना पन्नू म्हणाला होता की, त्यांनी 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करु नये, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे.

या प्रकरणावर, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, भारत सरकार आपल्या देशात अतिरेकी घटकांना जागा देऊ नये यासाठी परदेशी सरकारांवर दबाव आणत राहील. हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या कट्टरतावादी आणि दहशतवादी (Terrorist) घटकांबाबत सरकार परदेशी सरकारांच्या संपर्कात आहे.

38 वर्षांपूर्वी खलिस्तानी दहशतवाद्यांनी विमान उडवले होते

खलिस्तानी दहशतवाद्यांनी 38 वर्षांपूर्वी एअर इंडियाला लक्ष्य केले होते, ज्याला कनिष्क विमान अपघात म्हटले जाते. कॅनडाच्या इतिहासातील ही दहशतवादाची सर्वात भीषण घटना होती. 23 जून 1985 रोजी एअर इंडियाचे विमान भारतात येत होते.

एअर इंडियाच्या या विमानात खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला होता, ज्यात 329 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. विमान समुद्रात पडले.

त्याचवेळी, टोकियोच्या नारिता विमानतळावर आणखी एक स्फोट झाला, ज्यामध्ये दोन जपानी बॅग हाताळणारे ठार झाले. बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात हा बॉम्ब ठेवण्याचा कट होता, पण वेळेपूर्वीच त्याचा स्फोट झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

SCROLL FOR NEXT