India-Canada Row: भारताशी पंगा महागात, कॅनडाला बसणार 70 कोटी डॉलर्सचा फटका

India-Canada Row: कॅनडामध्ये दरवर्षी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते. दरवर्षी भारतातून सुमारे दोन लाख मुले कॅनडामध्ये शिक्षणासाठी जातात.
Due to ongoing dispute with India, Canada to lose 70 crore dollars.
Due to ongoing dispute with India, Canada to lose 70 crore dollars.Dainik Gomantak
Published on
Updated on

Due to ongoing dispute with India, Canada to lose 70 crore dollars: दहशतवादाचे समर्थन करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीपसिंग निज्जरचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा भारताकडून सध्या मिळत असलेला पलटवार त्यांना अपेक्षित नव्हता.

कॅनडाने एका भारतीय मुत्सद्याची हकालपट्टी केली तेव्हा भारतानेही तसेच केले. एवढेच नाही तर भारताने कॅनडाला आपल्या ४० राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. आता हे उघड झाले आहे की खलिस्तान समर्थकांच्या मांडीवर बसलेले ट्रूडो भारताशी पंगा घेऊन 700 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान करुन घेणार आहेत.

इमेज इंडिया संस्थेने असा निष्कर्ष काढला आहे की, 2024 मध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत केवळ 5 टक्के घट झाली तरी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला 70 कोटी डॉलर्सचे नुकसान होईल.

कॅनडामध्ये दरवर्षी उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते. दरवर्षी भारतातून सुमारे दोन लाख मुले कॅनडामध्ये शिक्षणासाठी जातात. 2022 मध्ये सुमारे 225,000 भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडाचा व्हिसा मंजूर करण्यात आला.

Due to ongoing dispute with India, Canada to lose 70 crore dollars.
युएईतील 35 लाख भारतीयांची कटकट संपली, आता काही सेकंदात पाठवता येणार कुटुंबियांना पैसे

समोर येत असलेल्या माहितीनुसार, इमेज इंडियाचे अध्यक्ष रॉबिंदर सचदेव म्हणाले की, भारतीय विद्यार्थी दरवर्षी जानेवारी, मे आणि सप्टेंबर अशा तीन बॅचमध्ये कॅनडाला जातात. जानेवारीच्या प्रवेशादरम्यान सुमारे एक तृतीयांश किंवा 66,000 लोक कॅनडाला जातात असे त्यांनी सांगितले.

अभ्यासात असे म्हटले आहे की, भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहेत, ज्यामुळे कॅनडाला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊ शकते.

Due to ongoing dispute with India, Canada to lose 70 crore dollars.
"हे अन्यायकारक...", अफगान नागरिकांना देशाबाहेर काढण्याचा पाकिस्तानचा निर्णय तालिबानच्या जिव्हारी

अभ्यासानुसार, कॅनडातील प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याचा सरासरी एकूण खर्च 16 हजार डॉलर्स आहे. यात लॅपटॉप खरेदी, निवास खर्च, बँक सुरक्षा आणि विमान तिकीट यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन वर्षांच्या अभ्यासाची आणि निवासाची एकूण किंमत प्रति विद्यार्थी 53 हजार डॉलर्स इतकी येते. एका भारतीय विद्यार्थ्यी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत दोन वर्षांत अंदाजे 69 हजार डॉलर्सचे योगदान देतो.

अभ्यासात असे म्हटले आहे की, जर जानेवारीच्या बॅचसाठी नोंदणीमध्ये फक्त 5 टक्के कपात झाली तर त्यामुळे 230 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होईल.

मे आणि सप्टेंबरमध्ये टंचाईमुळे 690 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होईल. याशिवाय जेव्हा विद्यार्थ्यांचे व्हिसासाठी अर्ज कमी झाल्यास कॅनडाचे 3 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com