Canada India Tension Dainik Gomantak
ग्लोबल

Canada India Tension: कॅनडाकडून भारतीय डिप्लोमॅट्सची हेरगिरी; अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, हालचालींवर लक्ष...

निज्जर खून प्रकरणाच्या तपासासाठी अधिकारी भारतात

गोमंतक ऑनलाईन टीम

Canada India Tension: खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करण्यापूर्वी कॅनडाने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची हेरगिरी केली होती. कॅनडाच्या एका अधिकाऱ्याने एपी या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

अधिकाऱ्याच्या माहितीनुसार कॅनडातील भारतीय अधिकारी आणि मुत्सद्दींवर कॅनडा लक्ष ठेवून आहे.

याशिवाय फाईव्ह आय देशांच्या सदस्यांनीही कॅनडाला गुप्तचर माहिती गोळा करण्यात मदत केली. कॅनेडियन मीडिया सीबीसीच्या वृत्तानुसार, भारतीय अधिकारी कोणाला भेटले, कोणाशी बोलले, या सर्व गोष्टींचा मागोवा घेण्यात आला.

CBC ने कॅनडाच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन दावा केला आहे की, जेव्हा भारतीय अधिकार्‍यांवर दबाव टाकला गेला तेव्हा निज्जरच्या हत्येत भारत सरकारच्या हस्तक्षेपाचा पुरावा असल्याचे त्यांनी नाकारले नाही, असे समजते. दरम्यान,

निज्जरच्या हत्येच्या तपासात सहकार्य मिळवण्यासाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अनेकवेळा भारताला भेट दिल्याचेही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) ज्युडी थॉमस ऑगस्टमध्ये 4 दिवस भारतात आल्या होत्या. तसेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत 5 दिवसांसाठीही त्या भारतात आल्या होत्या.

पंतप्रधान ट्रुडोंचे वक्तव्य

कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीनंतर सांगितले होते की, त्यांनी भारतावर केलेले आरोप हे घाईघाईने नाही तर पूर्ण गांभीर्याने केले आहेत. मात्र, कॅनडाने अद्याप आपल्या आरोपांबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही.

व्हिसा सेवा बंद

कॅनडाशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, कॅनडामधील आमच्या डिप्लोमॅटिक युनिटला धमक्या येत आहेत.

त्यांना त्यांचे काम करता येत नाही. त्यामुळेच व्हिसा सेवा स्थगित केली आहे. कॅनडा दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोपही बागची यांनी केला होता.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, कॅनडाचे सर्व आरोप हास्यास्पद आहेत. कॅनडाचे आरोप म्हणजे खलिस्तानी दहशतवादी आणि अतिरेकी यांच्यापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे.

त्यांना कॅनडाने अभय दिले ते भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडत्वासमोरील धोका आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर या प्रकरणी बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT