Britain's Minister Criticize Indians: ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅन (Suella Braverman) या भारतीय मूळाच्या नेत्या असल्या तरी सध्या त्या भारतीयांविरोधातच उभ्या ठाकल्या आहेत. ब्रिटनमध्ये व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही सर्वाधिक काळ व्यतित करणाऱ्यांमध्ये भारतीय अव्वल आहेत, असे मत ब्रेवरमॅन यांनी नुकतेच एका मुलाखतीत व्यक्त केले आहे.
तसेच बेवरमॅन यांनी भारताच्यासोबतच्या मुक्त व्यापार करार (FTA) लाही विरोध केला आहे आणि या करारामुळे ब्रिटनमध्ये भारतीयांचे स्थलांतर आणखी वाढू शकते, असा दावा केला आहे. ब्रिटनच्या बर्मिंघम येथील हुजूर पक्षाच्या वार्षिक संमेलनानंतर त्या बोलत होत्या.
विशेष म्हणजे, या संमेलनात त्यांच्याच पक्षाच्या नेत्या केमी बॅडनेओच यांनी भारतासोबत मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पुर्ण करण्याची घोषणा केली होती.
इंग्लंडच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या या मुक्त कराराच्या प्रभारी बॅडेनओच यांनी स्पष्ट केले होते की, हा मुक्त व्यापार करार कालमर्यादेत पुर्ण करण्यासाठी ब्रिटन कटिबद्ध आहे. त्यांनी दोन दिवसांपुर्वी या कराराबातच्या शंकाही दूर केल्या होत्या.
भारताशी करारास ब्रेवरमॅन यांचा आक्षेप
एका ब्रिटिश मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ब्रेवरमॅन म्हणाल्या की, भारतीयांसाठी ब्रिटनच्या सीमा खुल्या करण्याच्या या धोरणाबाबत मी चिंतेत आहे. लोकांनी यासाठी ब्रेक्झिटच्या बाजूने मतदान केलेले नव्हते. विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी नियम लवचिक करण्यास माझा आक्षेप आहे.
ब्रिटनमध्ये व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही येथे वास्तव्य करणाऱ्यांमध्ये भारतीय स्थलांतरितांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे देशात अवैध प्रवासी आणि व्हिसा कालावधी उलटूनही राहणाऱ्यांच्या संख्येत खूप मोठी वाढ झाली आहे.
२० हजार ७०६ भारतीयांचा ओव्हरस्टे
ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये २० हजार ७०६ भारतीयांनी व्हिसा कालावधीपेक्षा अधिक काळ ब्रिटनमध्ये व्यतित केला होता. इतर देशांच्या नागरिकांच्या तुलनेत हा काळ अधिक आहे. २०२० मध्ये 473,600 भारतीयांचा व्हिसा कालावधई संपला होता, त्यातील 4,52,894 भारतीयांनी ब्रिटन सोडले. पण ४.४ टक्के लोकांनी ओव्हरस्टे केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.