Britain: Five people dead in firing including three years child in Plymouth Dainik Gomantak
ग्लोबल

ब्रिटनमध्ये गोळीबाराचा थरार,तीन वर्षांच्या चिमुकलीसह पाच जणांचा मृत्यू

ब्रिटनमध्ये (Britain) एक धक्कदायक घटना घडली आहे. दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या प्लायमाउथमध्ये (Plymouth) एका व्यक्तीने तीन वर्षांच्या मुलीसह पाच जणांची गोळ्या घालून हत्या केली

दैनिक गोमन्तक

ब्रिटनमध्ये (Britain) एक धक्कदायक घटना घडली आहे. दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या प्लायमाउथमध्ये (Plymouth) एका व्यक्तीने तीन वर्षांच्या मुलीसह पाच जणांची गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.(6 dead in in Plymouth )

याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे की,22 वर्षीय हल्लेखोर जॅक डेव्हिसनने प्रथम त्याची आई, 51 वर्षीय मॅक्सिन डेव्हिसनची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच्या राहत्या घराबाहेर पडून एका तीन वर्षांच्या मुलीची आणि तिच्या वडिलांची हत्या केली .तसेच हल्लेखोराने जवळून जाणाऱ्या आणखी दोन लोकांना गोळ्या घातल्या आणि त्यांना गंभीर जखमी केले आहे. तो इतकंच करून न थांबता त्याने पुन्हा एक महिला आणि एका पुरुषाला गोळी घातली आणि यानंतर पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला.

जॅक डेव्हिसनने नंतर स्वतःवरही गोळी झाडत स्वतःलाही संपवले पोलिसांनी याबाबत स्पष्ट केले आहे की, ही दहशतवादाशी संबंधित घटना नसून हि संपूर्ण घटना केवळ ६ मिनिटांत घडली आहे.या हल्ल्यामागचे मागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

पोलिसांनी घटनेनंतर लगेचच हे फुटेज इंटरनेटवर अपलोड न करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.या घटनेबाबत दुःख व्यक्त करताना ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विटर करत म्हण्टले आहे की 'गुरुवारी रात्री प्लायमाउथमध्ये झालेल्या दुःखद घटनेत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या मित्र आणि कुटुंबासोबत माझी सहानभूती आहे. आणि त्याचबरोबर मी आपत्कालीन सेवेचे आभार मानू इच्छितो. '

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT