Bomb blast  Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan Bomb Blast: काबुलमध्ये बॉम्बचा धमाका; आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू

Afghanistan: आणखी किती लोकांनी आपला प्राण गमावला याची माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमन्तक

Bomb Blast in Kabul, Afganistan: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये बॉंब फुटल्याची घटना घडली आहे. या धमाक्यात 6 लोकांचा मृत्यू झाला झाल्याची माहीती मिळाली आहे.

विदेशी मंत्रालयाच्या बाहेर झालेल्या या धमाक्यात आणखी किती लोकांनी आपला प्राण गमावला याची माहिती मिळू शकली नाही.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमाका मोठा होता आणि धमाक्यानंतर लोक सैरावैरा पळत होते. मात्र अफगाणिस्तानच्या सरकारकडून याबाबत कोणतीही माहीती देण्यात आली नाही.

दरम्यान , अफगाणिस्तानमध्ये तालीबानची राजवट स्थापन झाल्यापासून बॉबचा धमाका किंवा गोळीबारासारख्या घटना अफगाणिस्तानसाठी नवीन नसल्याचे म्हटले जात आहे.

याआधीदेखील जानेवारीमध्ये झालेल्या धमाक्यात 20 लोकांना प्राण गमावावे लागले होते. 12 डिसेंबरला देखील काबुलच्या एका हॉटेलला निशाना बनवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT