Pakistan: 'एक तर इम्रान खान मारले जातील नाहीतर आमची हत्या होईल!'- राणा सनाउल्लाह यांचे खुले आव्हान

Pakistan: पीएमएल-एनचे अस्तित्व धोक्यात आहे
 Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Pakistan: पाकिस्तानमध्ये दरदिवशी हिंसाचाराच्या घटना घडताना दिसत आहेत. पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्ष नेहमीच दिसून येतो.

आता पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी पाकिस्तानचे तत्कालिन प्रधानमंत्री इम्रान खान यांच्याविषयी मोठे विधान केले आहे.

इम्रान खान यांनी देशाच्या राजकारणाला त्या ठिकाणी नेऊन ठेवले आहे जिथे त्यांची हत्या होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. एकतर त्यांची हत्या होईल किंवा आमची असे पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांच्या राजकारणामुळे आम्ही या स्थितीत आहोत एकतर ते राहू शकतात किंवा आम्ही राहू शकतो. एक तर पीटीआई किंवा मग पीएमएल-एन. त्यांनी पुढे म्हटल्यानुसार, पीएमएल-एनचे अस्तित्व धोक्यात आहे आणि या संस्थेच्या अस्तित्वासाठी आम्ही कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो.

इम्रान खान यांनी राजकारणाला शत्रुत्वामध्ये बदलले आहे .आता ते आमचे शत्रु आहेत आणि त्यांच्यासोबत असाच व्यवहार केला जाईल असेही राणा सनाउल्लाह यांनी म्हटले आहे.

 Imran Khan
Worlds Largets Graveyard: 'या' देशात आहे जगातील सर्वात मोठे कब्रस्तान, जिथे दफन केले जातात करोडो मृतदेह

राणा सनाउल्लाह यांना पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्या जवळचे मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षी नोव्हेंबरमध्ये पंजाबच्या वरीदाबाद रॅलीमध्ये इम्रान खान यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

तेव्हा त्यांनी आपल्या हत्येचा कट राणा सनाउल्लाह यांनी केल्याचे म्हटले होते. याबरोबरच, जेव्हा इम्रान खान यांनी याबाबतची एफआयआर दाखल केली होती तेव्हा पाकिस्तानचे सध्याचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ आणि एका वरिष्ठ आयएसआय अधिकाऱ्याचा उल्लेखदेखील केला होता.

 Imran Khan
Gurdwara Shooting in California: कॅलिफोर्नियातील गुरुद्वारात बेशुट गोळीबार, दोन जणांची प्रकृती चिंताजनक

दरम्यान, राणा सनाउल्लाह यांना त्यांच्या इम्रान खान यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर पाकिस्तानमध्ये अराजकता निर्माण होणार नाही का असा प्रश्न विचारल्यानंतर पाकिस्तान( Pakistan )मध्ये अगोदरच अराजकता पसरली आहे असे उत्तर त्यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com