Supermoon 2022 Dainik Gomantak
ग्लोबल

Supermoon 2022: 13 जुलैला पाहता येणार सुपरमुनचे सुंदर दृश्य

Supermoon 2022: या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आल्याने वर्षातील सर्वात मोठा सुपरमून दिसेल.

दैनिक गोमन्तक

Supermoon 2022: या वर्षातील मोठ्या खगोलीय घटनांपैकी एक 'सुपरमून' (Supermoon 2022) जुलैमध्ये दिसणार आहे. यंदा 13 जुलै रोजी हा सुपरमुनचे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा सुपरमून दिसतो. सुपरमूनच्या रात्री, चंद्र रोजच्या तुलनेत खूपच मोठा, चमकदार आणि गुलाबी दिसतो. 13 जुलै रोजी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी असते. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून केवळ 357,264 किमी अंतरावर असतो. (Biggest Supermoon of 2022 to be visible on 13 july)

सुपरमूनचा प्रभाव हा समुद्रावरही दिसुन येणार आहे. सुपरमूनमुळे भरती-ओहोटीची शक्यता वाढते. खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सुपरमूनच्या वेळी किनारपट्टीच्या भागात येणारे वादळ पूरसदृश परिस्थिती निर्माण करू शकतात. 2022 चा दुसरा सुपरमून या आठवड्यात तीन दिवस राहणार असल्याचे अमेरिकन अंतराळ संस्था नासाने(NASA) म्हटले आहे. नासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सुपरमूनचे सुंदर दृश्य सुमारे तीन दिवस पाहता येणार आहे.

13 जुलै रोजी रात्री 12:07 वाजता, सुपरमून दिसणार आहे. यानंतर तो 3 जुलै 2023 रोजी दिसणार आहे. सुपरमूनला बकमून असेही म्हणतात. याशिवाय जगभरात त्याची वेगवेगळी नावे आहेत. सुपरमून वर्षातून फक्त तीन ते चार वेळा दिसतो. 2022 चा पहिला सुपरमून जूनमध्ये होता. वर्षातील तिसरा आणि शेवटचा सुपरमून ऑगस्टमध्ये दिसणार आहे.

सुपरमून हा शब्द पहिल्यांदा रिचर्ड नोल यांनी 1979 मध्ये वापरला होता. चंद्र आणि पृथ्वीमधील सरासरी अंतर चार लाख किलोमीटरपेक्षा जास्त आहे. पण यावेळी सुपरमूनच्या निमित्ताने हे अंतर सुमारे साडेतीन लाख किलोमीटर असेल. यामध्ये 'सुपर'चा अर्थ काही नाही. फक्त एक गोष्ट घडते की चंद्र इतर दिवसांपेक्षा मोठा दिसतो आणि त्याची चमक अधिक असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT