Britain PM Race
Britain PM RaceDainik Gomantak

ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानाची 5 सप्टेंबरला होणार घोषणा, एका पदासाठी 11 दावेदार

Britain PM Race: ब्रिटनला 5 सप्टेंबर रोजी मिळणार नवा पंतप्रधान
Published on

ब्रिटनमधील (Britain) सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाने माहिती दिली आहे की यूकेच्या नवीन पंतप्रधानाची घोषणा 5 सप्टेंबर रोजी केली जाईल. सध्या राजीनामा दिलेल्या बोरिस जॉन्सन यांना तोपर्यंत पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी सध्या 11 उमेदवार रिंगणात आहेत. (Britain PM Race News)

ब्रिटनमधील (Britain) सरकारमध्ये उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी अचानक पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची बाजू सोडण्यास सुरुवात केल्यावर हे सर्व सुरू झाले. त्याच वेळी, सरकारच्या 50 हून अधिक सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांना त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.

* नवीन पंतप्रधानांची निवड 5 सप्टेंबरला होणार

सध्यातरी असे सांगण्यात येत आहे की संसदेच्या प्रभावशाली 1922 समितीने सोमवारी पक्षाच्या नेतृत्व निवडणुकीचे वेळापत्रक तयार केले आहे. 1922 समितीचे अध्यक्ष ग्रॅहम ब्रॅडी यांनी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधानपदासाठीचे नामांकन मंगळवारपर्यंत अधिकृतपणे उघडले जातील. त्याचबरोबर उन्हाळी सुट्टीनंतर 5 सप्टेंबरला नव्या पंतप्रधानाची निवड होणार आहे.

Britain PM Race
'ज्या निवडणूक प्रचारात आबे यांना गोळ्या घालण्यात आल्या...', किशिदा 2025 पर्यंत PM

खासदार ख्रिस पिंचर यांच्यामुळे त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी बोरिस जॉन्सनविरोधात बंड केले होते. यूके वृत्तपत्र द सनच्या वृत्तानुसार, कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार ख्रिस पिंचर यांनी लंडनमधील एका खासगी क्लबमध्ये दोन पुरुषांना आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केल्याचा दावा करण्यात आला आहे.

* ब्रिटिश भारतीय ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार

सध्या ख्रिस पिंचर (Chris Pincher) यांनी लैंगिक छळाच्या आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण तोपर्यंत अनेक खासदार बोरिस जॉन्सनच्या विरोधात गेले. त्याच वेळी, बोरिस जॉन्सनच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले ब्रिटिश भारतीय ऋषी सुनक (Rishi Sunak) हे पंतप्रधानपदासाठी सर्वात मजबूत उमेदवार मानले जात आहेत. दरम्यान, ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिझ ट्रेस (Liz Truss) याही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील झाल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com