Bangladeshi citizens protest against Indian government Dainik Gomantak
ग्लोबल

बांगलादेशात भारत सरकार विरोधात घोषणाबाजी

नुपूर यांच्या वक्तव्याचाही तीव्र निषेध करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानावरून देशभरात निदर्शने सुरू आहेत. अनेक शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. देशातील काही भागात दगडफेकही झाली आहे. याची आग आता बांगलादेशात पोहोचली असून, तेथे हजारो लोकांनी शुक्रवारच्या नमाजानंतर रस्त्यावर निदर्शने केली.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे नमाज पढल्यानंतर अनेकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, नुपूर यांच्या वक्तव्याचाही तीव्र निषेध करण्यात आला. त्या निदर्शनादरम्यान, निषेध नोंदवून 16 जून रोजी भारतीय दूतावासाला घेराव घालण्यात येईल, अशी वारंवार घोषणा करण्यात आली. या निदर्शनात जमियत उलेमा बांगलादेश, खिलाफत मजलिसचे अनेक लोक सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येकजण केवळ भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नव्हता, तर भारतात बनवलेल्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालण्याबाबत बोलत होता.

हे निदर्शन सुरू असताना घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. ढाक्याचे पोलिस आयुक्त अब्दुल अहद म्हणतात की, या प्रदर्शनासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. मात्र तरीही पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरू आहे. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई केली जाईल, असेही ठणकावून सांगितले आहे.

मात्र या मुद्द्यावरून बांगलादेशात सध्या गदारोळ माजला आहे. इस्लामिक मूव्हमेंट ऑफ पबना युनिटचे अध्यक्ष आरिफ बिलाह म्हणतात की, विधान केवळ आपल्या पैगंबराचा अपमान करणारे नाही, तर जगातील प्रत्येक मुस्लिमाला त्या विधानाने दु:ख झाले आहे. अशी विधाने करणाऱ्या सर्वांवर कारवाईची गरज आहे. सध्या बांगलादेशातील नारायणगंज, पबना, माणिकगंज भागात सर्वाधिक गोंधळ पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT