'अमूर' नदीवरील पूल रशियासाठी ठरणार वरदान, आशियातील मार्ग होणार खुला

रशिया आणि चीनमधील पहिल्या रोड ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे.
Road Bridge
Road Bridge
Published on
Updated on

रशिया आणि चीनमधील पहिल्या रोड ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले आहे. चीन आणि रशियाने त्यांच्या देशांदरम्यान बांधलेल्या पहिल्या पुलाचे उद्घाटन केले. युक्रेनमधील हल्ल्यामुळे पाश्चात्य देशांच्या निशाण्यावर असलेल्या रशियासाठी हा पूल आशियातील नवा मार्ग खुला करणार आहे. अमूर नदीवर बांधलेला सुमारे एक किलोमीटर लांबीचा पूल, सुदूर पूर्वेकडील रशियन शहर ब्लागोवेश्चेन्स्कला चीनमधील उत्तरेकडील हीहे शहराशी जोडतो. या पुलाचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते परंतु कोरोना महामारीमुळे त्याचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते.

दरम्यान, शुक्रवारी ब्लागोवेश्चेन्स्कमध्ये एका समारंभात हा पूल मालवाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पहिल्या ट्रकचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.

Road Bridge
युक्रेन रशिया युद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदींची जुन मध्ये चीन अन् रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बैठक

दुसरीकडे, या पुलाच्या बांधकामासाठी 19 अब्ज रुबल ($328 दशलक्ष) खर्च आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार याची पुष्टी झाली आहे. रशिया (Russia) आणि चीन (China) गेल्या काही वर्षांत एकमेकांच्या जवळ आले असून दोन्ही देशांनी एकमेकांशी राजकीय आणि आर्थिक सहकार्य वाढवले आहे. अमेरिकेचा (America) जागतिक दबदबा कमी करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com