PM Narendra Modi Dainik Gomantak
ग्लोबल

Operation Sindoor: जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिलं असतं तर... बलुच नेत्याचं PM मोदींना खुलं पत्र

Balochistan Leader Mir Yar Baloch Open Letter: बलुचिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार मीर यार बलोच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले. पत्रात त्यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला.

Manish Jadhav

बलुचिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार मीर यार बलोच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले. पत्रात त्यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. या पत्रात त्यांनी 1998 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणुचाचण्यांना नरसंहाराची सुरुवात म्हटले. एवढेच नाहीतर त्यांनी जागतिक समुदयाला पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त करण्याचे आवाहन देखील केले. त्यांनी मोदींना असे आवाहन केले की, भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात उघडपणे पाठिंबा द्यावा.

मीर यार बलोच यांनी पत्राची सुरुवात 28 मे 1998 रोजी बलुचिस्तानमधील चगाई येथे पाकिस्तानने (Pakistan) केलेल्या अणुचाचण्यांपासून केली. त्यांनी लिहिले की, पाकिस्तानी सैन्याने नवाज शरीफ सरकारच्या संगनमताने बलोच भूमी उद्ध्वस्त केली. या स्फोटांमुळे चगाई आणि रास कोहच्या टेकड्यांवर अजूनही स्फोटकांचा घाण वास येतो. त्यांनी नमूद केले आहे की, या चाचण्यांमुळे मोठ्याप्रमाणावर शेतजमीन उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मृत्युमुखी पडली. एवढचं नाहीतर अंपग मुले जन्माला येत आहेत.

“पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय हे दहशतवादाचे जनक”

पत्रात बलुच नेत्याने थेट पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयला दहशतवादी संघटनांचे जनक म्हटले. त्यांनी असा दावा केला की, ''आयएसआय दर महिन्याला एक नवीन दहशतवादी संघटना तयार करते आणि त्याचा वापर भारत, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, अगदी अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध करते. पाकिस्तान दहशतवादाची जननी आहे. त्यामुळे दहशतवादाची मुळे उखडल्याशिवाय संपणार नाहीत.''

“पाकिस्तान बलुचिस्तानची लुट करत आहे”

बलुचिस्तानच्या सोने, तांबे, वायू, तेल आणि युरेनियम लुटून पाकिस्तान आपली कमकुवत अर्थव्यवस्था चालवत आहे. या पैशातून दहशतवादी संघटनांनाही फंडिंग केले जात आहे, असा आरोप मीर यार बलोच यांनी केला. पत्रात पुढे त्यांनी चीनचाही उल्लेख आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चीनने बलुचिस्तानमध्ये आशियातील सर्वात मोठे विमानतळ बांधले आहे. तसेच, चीन प्रत्येक पातळीवर पाकिस्तानच्या सैन्याला पाठिंबा देत आहे.

“आम्ही भारताला पाठिंबा दिला, आता भारतानेही आम्हाला पाठिंबा द्यावा”

बलुच नेत्याने पुढे दावा केला की, जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले तेव्हा बलुच लोकांनी उघडपणे भारताला पाठिंबा दिला. जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिले असते तर आज आपण स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत आणि जगाशी बोलत असतो. पत्राच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले की, भारताने बलुचिस्तानशी अधिकृत संबंध प्रस्थापित करावेत आणि दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास उघडावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: पर्वरीतील कार्यालयाचे उद्घाटन अधुरेच! फेब्रुवारीतील 'दादांचा' नियोजित गोवा दौरा कायमचा रद्द

Chimbel Unity Mall Controversy: चिंबलचा विजय, सरकारची माघार! 32 दिवसांच्या चिवट लढ्यानंतर 'युनिटी मॉल'चा प्रकल्प रद्द

Rashi Bhavishya: पैसा खुळखुळणार! मालमत्ता ताब्यात येणार; 'या' राशींना मिळणार गोड बातमी

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

SCROLL FOR NEXT