Operation Sindoor: गोव्याला अतिरेक्यांपेक्षा अफू, गांजा, चरसचा धोका; ब्रिगेडियर महाजनांचा इशारा; बांगलादेशी घुसखोरीबाबत चिंता

Brigadier Hemant Mahajan Goa Speech: पाकिस्तानला नमविण्यासाठी त्याच्या सैन्याची ताकद कमी केली पाहिजे, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन(निवृत्त) यांनी व्यक्त केले.
Brigadier Hemant Mahajan Goa Speech
Brigadier Hemant Mahajan Goa SpeechX
Published on
Updated on

पणजी: भारत आता पूर्वीपेक्षाही अधिक आक्रमक झालाय. भारताने पाकिस्तानविरुद्ध जलयुद्ध, आर्थिक युद्ध, माहिती युद्ध आणि अशा विविध स्तरावर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बहुआयामी युद्ध लढले जात असून पाकिस्तानला नमविण्यासाठी त्याच्या सैन्याची ताकद कमी केली पाहिजे, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन(निवृत्त) यांनी व्यक्त केले.

कला आणि संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात धन्वंतरी प्रतिष्ठान गोवाने आयोजित केलेल्या ऑपरेशन सिंदूर : भारताची भूमिका आणि पुढील वाटचाल या विषयावर ते बोलत होते.

यावेळी गोवा संघ प्रमुख राजेंद्र भोबे, धन्वंतरी प्रतिष्ठानच्या वैभवी देसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. महाजन म्हणाले की, पहलगाममध्ये पर्यटकांवर जो भ्याड हल्ला झाला, त्यातील दहशतवाद्यांना चीनने मदत केली.

Brigadier Hemant Mahajan Goa Speech
Operation Sindoor: 'त्यांनी गोळी झाडली, पण आपण धमाका केला...'; भारताच्या मेजरने सांगितली ऑपरेशन सिंदूरची A टू Z माहिती

बांगलादेशींच्या घुसखोरीत वाढ

आज भारतात बांगलादेशीची घुसखोरी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सुमारे ६ ते ७ कोटी बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. गोव्यात हजारोंच्या संख्येने आहेत. कोणी आपण झारखंड, कोणी बिहार तर कोणी आपण उत्तरप्रदेशचा असल्याचे सांगतो परंतु ते सर्व बांगलादेशी आहेत. त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. हा देशाला लागलेला कर्करोग असून आत्ताच आम्ही सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे महाजन यांनी सांगितले.

Brigadier Hemant Mahajan Goa Speech
Terrorist Attack: एकामागून एक 3 वाहने उडवली... कराची-क्वेट्टा महामार्गावर पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 32 सैनिक ठार

गोव्याला गांजा, चरस ड्रग्सचा धोका

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर अतिरेकी हल्ला होईल म्हणून गस्त घातली जातेय. परंतु अतिरेक्यांपेक्षाही गोव्यात दाखल होणाऱ्या अफू, गांजा, चरस तसेच इतर अमलीपदार्थांपासून अधिक धोका आहे. मागील वर्षी गोव्यात ३० हजार कोटींहून अधिक अमलीपदार्थ दाखल झाल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे उडता गोवा होण्यास अधिक काळ लागणार नाही, असे महाजन म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com