जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनाचे नव-नवे व्हेरिएंट आढळून येऊ लागले आहेत. यातच आचा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (AY.4.2) ग्रस्त रुग्णांची संख्या ब्रिटनसह (Britain) अनेक युरोपीयन देशांमध्ये वाढू लागली आहे. यातच या नव्या व्हेरिएंटला डेल्टा व्हेरिएंटदेखील प्रथमदर्शनी म्हटले जात आहे. कारण डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant) हा नवा व्हेरिएंट मूळ वंश असल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र ब्रिटनमध्ये या नव्या व्हेरिएंटमुळे मागील तीन दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आसपास पोहोचली आहे. डेल्टा स्टेनच्या या उपवंशीय व्हेरिएंटने ग्रस्त रुग्णांची संख्या रशिया आणि इस्राईलमध्येही मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहेत.
यूकेमध्ये आढळला हा AY.4.2 व्हेरिएंट मूळ डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 10-15% अधिक संसर्गजन्य असल्याचे म्हटले जाते. तथापि, सध्या तज्ञाकडून सांगण्यात येत आहे की, या व्हेरिएंटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता कमी आहे. परंतु त्याच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जर अधिक रुग्णांची संख्या वाढू लागली तर या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट सूचीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. असे असूनही, जर रुग्णांची संख्या वेगाने वाढ होत राहिली, तर ती व्हेरिएंट ऑफ कंसर्न यादीत ठेवली जाईल.
डेल्टा पासून नवा व्हेरिएंट किती वेगळा?
AY 4.2 हा प्रत्यक्षात डेल्टा व्हेरिएंटच्या उप-वंशीय प्रकाराचे प्रस्तावित नाव आहे. त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये Y145H आणि A222V हे दोन म्युटेशन आहेत. यूके तज्ञांनी जुलै 2021 मध्ये AY.4.2 ओळखले. एका अंदाजानुसार, हा नवीन उप-व्हेरिएंट यूकेमध्ये 8-9 टक्के नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आहेत. डेल्टा व्हेरिएंटने यूकेमध्ये कहर केला आहे. जीनोम सिक्वेन्सिंगमधून असे दिसून आले की, जुलै ते 20 ऑक्टोबर दरम्यान इंग्लंडमध्ये व्हीयूआय -21 ओसीटी -01 ची एकूण 15,120 केसेस नोंदवली गेली आहेत. त्याचा पहिला रुग्ण जुलै महिन्यात (यूके कोरोनाव्हायरस केसेस) नोंदवला गेला होता. गेल्या आठवड्यापर्यंत, डेल्टा व्हेरिएंटच्या एकूण प्रकरणांपैकी 6 टक्के प्रकरणे VUI-21OCT-01 शी संबंधित होते. इंग्लंडच्या सर्व नऊ क्षेत्रांमध्ये जीनोम सिक्वेंसींगनंतर याची पुष्टी झाली आहे. आता या नवीन उत्परिवर्तकाची चौकशी करुन, त्याच्याशी संबंधित धोक्यांविषयी अधिक माहिती गोळा केली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.