पाकिस्तानमध्ये आढळला कोरोनाचा 'कॅलिफोर्निया व्हेरिएंट'!

या व्हेरिएंटला B.1.429 हे नाव देण्यात आले आहे.
California variant
California variantDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नसताना यातच आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) कोरोनाच्या धोकादायक व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. पाकिस्तानच्या आरोग्य विभागाद्वारे या नव्या व्हेरिएंबद्दल सांगण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी तयार केलेल्या सायंटिफिक टास्क फोर्सचे सदस्य डॉ जावेद अक्रम (Dr. Javed Akram) यांनी म्हटले की, या कोरोनाच्या धोकादायक व्हेरिएंटला 'एप्सिलॉन' (Epsilon) म्हणून ओळखले जात आहे. आता त्याचा पाकिस्तानमध्ये पहिला रुग्ण आढळून आला आहे. या व्हेरिएंटचा जगातील पहिला रुग्ण कॅलिफोर्नियामध्ये (California) आढळून आला होता. त्यानंतर त्याला कॅलिफोर्निया व्हेरिएंट (California variant) असे नाव देण्यात आले होते. या व्हेरिएंटला B.1.429 असे नाव देण्यात आले आहे. डॉ अक्रम यांनी पुढे असेही म्हटले की, कॅलिफोर्निया नंतर ब्रिटनसह इतर युरोपियन देशांमध्येही या व्हेरिएंटची लागण झालेले अनेक रुग्ण आढळून आले होते. आता पाकिस्तानमध्ये या धोकादायक व्हेरिएंटच्या उपलब्धतेमुळे इम्रान खान सरकारच्या (Imran Khan Government) चिंतेत अधिकच वाढ झाली आहे.

दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. अक्रम म्हणाले की, एप्सिलॉन व्हेरिएंटचा संसर्ग देशात वेगाने पाय पसरु लागला आहे. आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की, या कोरोना व्हेरिएंटचा समूळ नाश करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच या व्हेरिएंटवर नियंत्रण मिळवण्यात आपल्याला नक्की यश मिळेल. त्यामुळे देशातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढण्याची शक्यताही आरोग्य तज्ञांकडून वर्तिविण्यात येऊ लागली आहे.

California variant
कोरोना महामारीमुळे जगातील 12 करोड लोक झाले गरीब, महिलांचे प्रमाण सर्वाधिक

तसेच, डॉ अक्रम हे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु देखील आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये जीन सिक्वन्सिंग केल्यानंतर, या व्हेरिएंटच्या सुमारे 40 रुग्णांची पुष्टी झाली आहे. प्रत्येक रुग्णाचे जीन सिक्वेंसींग करणे शक्य नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. या व्हिरेएंटपूर्वी आलेल्या व्हेरिएंटबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, हे आकडे जे समोर आले आहेत ते पूर्णपणे बरोबर नाहीत. देशात साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी दिल्या जाणाऱ्या लस या प्राणघातक व्हेरिएंटविरुध्द प्रभावी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com