Doctor Dainik Gomantak
ग्लोबल

धक्कादायक! 200 हून अधिक महिलांनी डॉक्टरवर केला शारीरिक छळाचा आरोप; गुन्हा दाखल

America Crime News: अमेरिकेतील एका डॉक्टरवर आपल्या रुग्णांचा शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Manish Jadhav

America Crime News: अमेरिकेतील एका डॉक्टरवर आपल्या रुग्णांचा शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 200 हून अधिक महिला आणि अनेक पुरुषांनी डॉक्टरवर शारीरिक छळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. बोस्टनचे डॉक्टर डेरिक टॉड यांनी शारीरिक तपासणीच्या नावाखाली रुग्णांचा विनयभंग केला आणि आवश्यक नसलेल्या चाचण्या केल्या असा आरोप आहे.

रुग्णांनी डॉक्टरवर गंभीर आरोप केले

डॉ. डेरिक टॉड हे बोस्टनमधील एका रुग्णालयात नोकरी करत होते, परंतु आरोपांनंतर त्यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये काढून टाकण्यात आले होते. आरोपी डॉक्टरवर पेल्विक फ्लोअर थेरपी, पुरुषांच्या अंडकोषांची तपासणी अशा रुग्णांच्या अनावश्यक चाचण्या केल्याचा आरोप आहे. 2010 पासून टॉड आपल्या रुग्णांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. मॅसॅच्युसेट्सच्या सफोक सुपीरियर कोर्टात डॉक्टराविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. ब्रिघम रुग्णालयासोबतच चार्ल्स रिव्हर मेडिकल असोसिएशन या अन्य रुग्णालयालाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

आरोपानंतर रुग्णालयाने आरोपी डॉक्टरला काढून टाकले

दरम्यान, 2023 मध्ये डॉक्टरांवर हे आरोप करण्यात आले होते आणि अनेक महिला रुग्णांनी याबाबत तक्रारीही केल्या होत्या. प्रकरण वाढल्याने आरोपी डॉक्टरला रजेवर पाठवण्यात आले आणि नंतर त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. या प्रकरणी रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, या आरोपांमुळे ते अत्यंत त्रस्त आहेत. रुग्णालयानेही तपासात सहकार्य करत आहे. पीडितांमध्ये किशोरवयीन मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंतचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसचा नवा सुलतान! रिलीजआधीच 'धुरंधर 2' ची 119 कोटींची कमाई; 'जवान' अन् 'RRR' ला सोडले मागे VIDEO

Middle East War: मध्यपूर्वेतील युद्धाबाबत 'भ्रामक' पोस्ट करण पडलं महागात, युएईमध्ये 19 भारतीयांसह 35 जण जेरबंद; सुटकेची आशा धूसर

SCROLL FOR NEXT