America Crime: 41 सेकंदात 100 राऊंड फायरिंग... सीट बेल्ट न लावलेल्या व्यक्तीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू

Chicago Police Shooting: अमेरिकेतील शिकागो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकागो पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Chicago Police Shooting
Chicago Police ShootingDainik Gomantak

Chicago Police Shooting: अमेरिकेतील शिकागो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकागो पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये साध्या वेशातील 5 पोलिस अधिकाऱ्यांनी 41 सेकंदात 100 राउंड फायर केले. संशयिताला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात 26 वर्षीय डेक्सटर रीड या अश्वेत व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची गाडी थांबवण्यासाठी पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे समजते.

दरम्यान, ही घटना गेल्या महिन्यात म्हणजे 21 मार्च रोजी घडली जेव्हा शिकागो पोलिसांनी रीडच्या कारला रोखण्यासाठी घेराव घातला. सीट बेल्ट न लावल्यामुळे पोलिसांनी रीडला थांबवले. त्यानंतर कारमध्ये बसलेल्या रीडने पोलिसांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरु केला. यात संशयिताचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओही जारी केला आहे.

Chicago Police Shooting
America Crime: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, बेपत्ता अब्दुलचा मृतदेह सापडला; या वर्षातील 11वी घटना

100 राऊंड फायरिंग

मात्र, जारी झालेल्या व्हिडिओवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रीड आधी गाडीतून बाहेर आला नाही. त्याने पोलिसांवर गोळीबार सुरु केला, ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर कार थांबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर जवळपास 100 राउंड फायर केले. मात्र, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अशी कोणतीही घटना दिसत नाहीये.

Chicago Police Shooting
America Crime: अमेरिकेत भारतीयांच्या मृत्यूचं सत्र थांबेना! आणखी एका विद्यार्थ्याला गमवावा लागला जीव

पोलिसांच्या गोळीबारावर कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केला

पोलिसांच्या गोळीबारावर प्रश्न उपस्थित करत पोलिसांची कारवाई अनैतिक असल्याचे म्हटले आहे. रीडची बहीण पोर्शा बँक्स हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, माझा भाऊ डेक्सटर रीडच्या मृत्यूचे दुःख मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. मी आणि माझे कुटुंब कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे फक्त आम्हालाच माहीत आहे.

या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन दोषींना शिक्षा व्हावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. पीडित कुटुंबाचे वकील स्ट्रोथ म्हणाले की, आम्ही काहीही केले तरी रीड परत येणार नाही, परंतु पुन्हा अशाप्रकारची हत्या होऊ नये यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करु शकतो. महापौर ब्रँडन जॉन्सन यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचे अटॉर्नी किम फॉक्स म्हणाले की, अधिकाऱ्यांचा बळाचा वापर न्याय्य किंवा अवाजवी होता हे त्यांचे कार्यालय ठरवेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com