Mass Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Mass Shooting: कौटुंबिक वादाचा भयानक अंत! एकाच रात्री 6 नातेवाइकांची निर्घृण हत्या; आरोपीनं पोलिसांसमोर स्वतःवर झाडली गोळी

Iowa Muscatine Mass Shooting: आयोवा शहरातील मस्केटाइन भागात एका 52 वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्याच 6 नातेवाइकांची वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निर्घृण हत्या केली.

Manish Jadhav

Iowa Muscatine Mass Shooting: अमेरिकेच्या आयोवा राज्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. आयोवा शहरातील मस्केटाइन भागात एका 52 वर्षीय व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्याच 6 नातेवाइकांची वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निर्घृण हत्या केली. या भयंकर हत्याकांडानंतर आरोपीने पोलिसांच्या समोरच स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मस्केटाइनचे पोलीस प्रमुख अँथनी कीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी नियंत्रण कक्षात एक फोन आला, ज्यामध्ये एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन रस्त्यावर फिरत असून एका घरातून गोळीबाराचा आवाज आल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत आरोपी तिथून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा तिथले दृश्य पाहून त्यांचेही डोळे चक्रावले. त्या घराच्या आत 4 जणांचे रक्ताने माखलेले मृतदेह पडले होते. पोलिसांनी (Police) तातडीने तपास चक्र फिरवून आरोपीची ओळख पटवली, त्याचे नाव रयान विलिज मॅकफर्लांड असे होते.

आरोपीचा शोध घेत असतानाच पोलिसांना तो मिसिसिपी नदीच्या किनाऱ्यावरील एका रस्त्यावर आढळून आला. त्याचवेळी पोलिसांना आणखी एक फोन आला, ज्यामध्ये एका कमर्शियल प्लेसच्या ठिकाणी दोन जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वेगाने हालचाली करत नदीकिनाऱ्यावरच आरोपी रयान याला चारही बाजूंनी वेढले. स्वतःला पोलिसांच्या विळख्यात अडकल्याचे पाहून आरोपीने क्षणाचाही विचार न करता स्वतःवर गोळी झाडली. पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु गंभीर दुखापतीमुळे त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, ही धक्कादायक आणि क्रूर घटना केवळ कौटुंबिक वादातून घडली. आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याच नातेवाइकांना टार्गेट केले. पोलिसांनी दोन घरे आणि एका व्यावसायिक ठिकाणाहून एकूण 6 मृतदेह ताब्यात घेतले असून, या सर्व मृतदेहांवर गोळ्यांचे निशाण आढळले. सर्व शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, हत्येसाठी वापरलेली बंदूकही जप्त करण्यात आली. सर्व 6 जणांची हत्या याच बंदुकीतून झाली की नाही, याचा फॉरेन्सिक तपास केला जात आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या हत्याकांडानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना धीर दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT