Amazon Dainik Gomantak
ग्लोबल

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

Amazon Fires 14000 Employees: जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात (Layoffs) केली आहे.

Manish Jadhav

Amazon Fires 14000 Employees: जगातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात (Layoffs) केली, परंतु यावेळी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची पद्धत अनेकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली. कर्मचाऱ्यांना सकाळी झोपेतून उठल्यावर मोबाईलवर एकापाठोपाठ एक दोन टेक्स्ट मेसेज आले आणि काही मिनिटांतच हजारो लोकांचे आयुष्य बदलून गेले. हे मेसेज नेहमीचे रुटीन अलर्ट नसून, ते थेट "तुम्हाला नोकरीवरुन काढण्यात आले आहे" असे सांगणारे संदेश होते.

काही मिनिटांत दोन मेसेज आणि नोकरी गेली

मिळालेल्या वृत्तानुसार, ॲमेझॉनने (Amazon) जगभरातून सुमारे 14,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्यांनी सकाळी उठल्यावर लगेच त्यांना दोन मेसेज आले. पहिला मेसेज होता, "कृपया तुमचा ईमेल तपासा" आणि दुसऱ्या मेसेजमध्ये एक हेल्प डेस्क नंबर देण्यात आला होता. कर्मचाऱ्यांनी जसा ईमेल उघडला, तेव्हा त्यांना कळले की त्यांची सेवा तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचे प्रवेश ओळखपत्र (Badge) आणि लॉगिन ॲक्सेस ब्लॉक करण्यात आले होते.

कर्मचाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण

या मोठ्या कर्मचारी (Employees) कपातीचा फटका प्रामुख्याने रिटेल मॅनेजमेंट टीम्सना बसला आहे. कंपनीने हे पाऊल व्यवसाय अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानात (Innovation) गतीने पुढे जाण्यासाठी उचलले असल्याचे म्हटले आहे. मात्र, अचानक आलेल्या या मेसेजने कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडवले. सोशल मीडियावर अनेक कर्मचाऱ्यांनी ॲमेझॉनच्या या पद्धतीला सर्वात थंड आणि अमानवीय (Inhuman) लेऑफ असल्याचे म्हटले.

ॲमेझॉनच्या अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

ॲमेझॉनच्या एचआर प्रमुख (HR Head) बेथ गॅलेटी यांनी अंतर्गत संदेशात सांगितले की, प्रभावित कर्मचाऱ्यांसाठी कंपनी 90 दिवसांपर्यंत पूर्ण वेतन आणि लाभ (Benefits) देईल. याव्यतिरिक्त, त्यांना एक रिटायरमेंट पॅकेज आणि नवीन नोकरी शोधण्यासाठी मदत (Job Placement Assistance) देखील दिली जाईल. "आम्हाला माहिती आहे की, हा काळ कठीण आहे, पण आम्ही प्रत्येक प्रभावित कर्मचाऱ्याला पूर्ण सहकार्य करु," असे त्यांनी नमूद केले.

कर्मचारी कपातीमागे AI चे कारण

या कर्मचारी कपातीमागे नेमके काय कारण आहे, हे गॅलेटी यांनी स्पष्ट केले. ॲमेझॉनची ही रणनीती केवळ खर्च कमी करण्याची नाही, तर त्याचे मोठे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, AI च्या वाढीमुळे आमच्या कामाची पद्धत बदलली आहे. त्यामुळे आता आम्हाला या नवीन तंत्रज्ञानानुसार पुढे जाण्यासाठी आमच्या संघटनेची (Structure) पुनर्रचना करावी लागेल.

टेक विश्वातील 'लेऑफ'चा नवा ट्रेंड

ॲमेझॉनपूर्वी गूगल (Google), मेटा (Meta) आणि टेस्ला (Tesla) यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना अचानक ईमेल किंवा मेसेजद्वारे नोकरीवरून काढून टाकले आहे. ॲमेझॉनने अवलंबलेली ही पद्धत आता टेक (Tech) विश्वात एक नवीन चर्चा सुरु करत आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ माणसांच्या नोकऱ्या गिळंकृत करत आहे का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT