Amazon-Flipkart Sale: स्मार्टफोन्सपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत... ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही; ॲमेझॉन-फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम सेल'चं बिगुल वाजलं!

Amazon-Flipkart Freedom Sale: ई-कॉमर्स शॉपिंग साइट्स ॲमेझॉनवर गुरुवारपासून (31 जुलै) 'फ्रीडम सेल' सुरु झाला असून फ्लिपकार्टवर (Flipkart) 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
Amazon-Flipkart Freedom Sale
Amazon-Flipkart Freedom SaleDainik Gomantak
Published on
Updated on

Amazon-Flipkart Freedom Sale: तुम्हाला जर शॉपिंग करायला आवडत असेल, तर तुमची शॉपिंग लिस्ट लगेच (Shopping List) तयार करा! ई-कॉमर्स (E-commerce) शॉपिंग साइट्स ॲमेझॉनवर गुरुवारपासून (31 जुलै) 'फ्रीडम सेल' सुरु झाला असून फ्लिपकार्टवर (Flipkart) 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या या धमाकेदार सेलची घोषणा दोन्ही कंपन्यांनी केली. त्यामुळे ग्राहकांना स्मार्टफोन्सपासून गॅजेट्स, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायंसेसवर भरघोस सूट मिळणार आहे.

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट फ्रीडम सेल कधी सुरु होणार?

ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 2025 (Amazon Great Freedom Festival Sale 2025): ॲमेझॉनने जारी केलेल्या पोस्टरनुसार, हा सेल 31 जुलैपासून सुरु झाला. मात्र, जर तुम्ही ॲमेझॉन प्राइम मेंबर असाल, तर तुम्हाला 12 तास आधी म्हणजेच 30 जुलैपासूनच या सेलचा फायदा घेता येईल.

फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2025 (Flipkart Freedom Sale 2025): फ्लिपकार्टवर हा सेल 1 ऑगस्टपासून सुरु होत आहे. 1 ऑगस्टपासून केवळ प्राइम मेंबर्सच शॉपिंग करु शकतील, तर सामान्य ग्राहकांसाठी हा सेल 2 ऑगस्टपासून सुरु होईल.

Amazon-Flipkart Freedom Sale
PM Kisan 20th installment: PM किसान योजनेच्या 20वा हप्त्याची तारीख जाहीर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार पैसे

कुठे किती सूट मिळेल?

ॲमेझॉनवर उपलब्ध ऑफर्स

  • घरगुती उत्पादने: 80% पर्यंत सूट.

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीज: 75% पर्यंत सूट.

  • फॅशन आणि ब्युटी: 50% ते 80% पर्यंत सूट.

  • स्मार्ट टीव्ही: 65% पर्यंत सूट.

  • स्मार्टफोन्स: आयफोनपासून (iPhone) सॅमसंगच्या (Samsung) प्रीमियम फोन्सपर्यंत (Premium Phones) मोठी सूट मिळेल.

याशिवाय, एसबीआय बँकेच्या (SBI Bank) क्रेडिट कार्डवर (Credit Card) 10% पर्यंत बँक डिस्काउंट (Bank Discount), एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) आणि इतर अनेक आकर्षक ऑफर्स ग्राहकांना मिळतील.

फ्लिपकार्ट फ्रीडम सेलमध्ये उपलब्ध ऑफर्स

  • 78 एक्सक्लुझिव्ह फ्रीडम डील्स: यात पर्सनल केअरपासून फॅशन, स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्स आणि होम अप्लायंसेसचा समावेश आहे.

  • 6 स्पेशल डील झोन्स: यामध्ये एक्सचेंज आवर्स, बंपर आवर्स, टिक-टॉक डील्स, रश आवर्स, 78 आवर्स फ्रीडम डील आणि प्राईस पॉईंट यांचा समावेश आहे. प्रत्येक टाइम झोनमध्ये ग्राहकांना उत्तम ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतील.

या व्यतिरिक्त, आयसीआयसीआय (ICICI) आणि बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10% पर्यंत बँक डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक (Flipkart Axis Bank) कार्डवर 5% पर्यंत कॅशबॅक आणि सुपरकॉईन्सवर अतिरिक्त 10% पर्यंत डिस्काउंट मिळेल.

Amazon-Flipkart Freedom Sale
PM Kisan 20th Installment: करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच खात्यात जमा होणार पीएम किसानचा 20वा हप्ता?

सेलसाठी कशी तयारी कराल?

दरम्यान, या सेलमध्ये चांगल्या प्रकारे शॉपिंग करता यावी यासाठी आपल्या पसंतीच्या प्रोडक्ट्सना आधीच विशलिस्टमध्ये (Wishlist) लिहून ठेवा. तसेच, अधिक ऑफर्स मिळवण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे प्राइम मेंबरशिप (Prime Membership) घेऊ शकता. यामुळे तुम्हाला 'अर्ली ॲक्सेस' सह अधिक डिस्काउंटचा फायदा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com