Israel Iran Tensions Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Iran Tensions: तिसऱ्या महायुद्धाचं सावट; इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जगात तणावाचं वातावरण

Manish Jadhav

Israel Iran Tensions: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नसताना इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाद चांगलाचं पेटला आहे. इराणने इस्रायलवर सुमारे 300 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागल्यानंतर संपूर्ण जगात तणावाचे वातावरण आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांसारखे पाश्चात्य देश आणि रशिया, चीन आणि भारत यांसारख्या आशियाई शक्ती या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पुढे काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नेतन्याहू सरकारने वॉर कॅबिनेटची दुसरी बैठक बोलावली आहे. यामध्ये इराणच्या कारवाईला योग्य प्रत्युत्तर कसे दिले जाईल यावर चर्चा होईल. तत्पूर्वी, रविवारीही वॉर कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत इराणच्या कारवाईचा बदला घेतला जाईल, यावर एकमत झाले, मात्र तो कसा घेतला जाईल, याचा निर्णय होऊ शकला नाही.

दरम्यान, इस्रायलकडून या क्षणी सावध पावले उचलण्याचे संकेत मिळाले आहेत, परंतु नेतन्याहू सरकार आपल्या कठोर वृत्तीसाठी ओळखले जाते. अशा स्थितीत नेतन्याहू सरकार सरप्राईज ॲटॅकचा निर्णयही घेऊ शकते. दुसरीकडे, जगभरातील नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत इराण आणि इस्रायलसोबत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, मी याचा तीव्र निषेध करतो. यासोबतच त्यांनी इस्रायलला संयम ठेवण्याचे आवाहनही केले. बेंजामिन नेतन्याहू यांना ताबडतोब युद्धात उडी घ्यायची होती, असे वृत्त आहे, परंतु असे करणे योग्य होणार नाही, असे बायडन म्हणाले.

बायडन यांच्याशिवाय युरोपियन नेत्यांचेही म्हणणे आहे की, रक्तपात आता थांबला पाहिजे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, मी इराणच्या हल्ल्याचा निषेध करतो. इराणच्या या कारवाईमुळे पश्चिम आशियातील स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे. ते पुढे म्हणाले की, फ्रान्सने दोन्ही देशांनी तणाव टाळण्याचे आवाहन केले आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांनीही शांततेचे आवाहन केले. यासोबतच, त्यांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध करत जगाला एका नव्या संकटात टाकल्याचे म्हटले. इराण आणि त्याच्या सहयोगी दहशतवादी संघटनांना तात्काळ थांबवायला हवे, असेही ते पुढे म्हणाले.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, आम्ही इराणच्या कारवाईचा तीव्र निषेध करतो. सौदी अरेबिया, इजिप्त, बहरीन, यूएई आणि कुवेतसह अनेक आखाती देशांनीही हा तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी, दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे तिसऱ्या महायुद्धाचं सावट आहे. हे आता थांबवले नाही, तर इराणचा हल्ला तिसऱ्या महायुद्धाची पूर्वतयारी असू शकतो. ते पुढे म्हणाले की, 'हे आधीच अपेक्षित होते. आपण तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहोत असे दिसते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT