Ramayana: रणबीरचा ‘राम’ अवतार ठरतोय गेमचेंजर! लॉस एंजेलिसमध्ये ‘रामायण’चा खास शो सुपरहिट; प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

Ramayana Los Angeles screening: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित पौराणिक महाकाव्यपट रामायणच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच, चित्रपटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Ramayana Los Angeles screening
Ramayana Los Angeles screeningDainik Gomantak
Published on
Updated on

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित पौराणिक महाकाव्यपट रामायणच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत असतानाच, चित्रपटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ताज्या वृत्तानुसार, चित्रपटाची पहिली टेस्ट स्क्रीनिंग नुकतीच पार पडली असून त्याला प्रेक्षकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.

लॉस एंजेलिस येथीलसिनेमार्क प्लाया विस्टा येथे या आठवड्यात निवडक प्रेक्षकांसाठी खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. १८ ते ६० वयोगटातील प्रेक्षक या निमंत्रित शोसाठी उपस्थित होते. यावेळी मिळालेल्या प्रतिक्रिया ‘अत्यंत सकारात्मक’ असल्याचे सांगितले जात आहे.

विशेषतः चित्रपटाची भव्यता, उच्च दर्जाचे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भावनिक मांडणी यांचे प्रेक्षकांनी कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. ही स्क्रीनिंग प्रामुख्याने प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आले होते, जेणेकरून दिवाळीपूर्वी अंतिम आवृत्तीत आवश्यक ते बदल करता येतील.

Ramayana Los Angeles screening
Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

मोठ्या बजेटमध्ये साकारला जाणारा हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामांच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Ramayana Los Angeles screening
Ramayana Park Goa: गोव्यात उभारतोय भव्य 'रामायण पार्क'! भाविकांसाठी ठरणार आकर्षण; पर्तगाळीत स्‍टेट ऑफ द आर्ट प्रकल्‍प

विशेष म्हणजे, ऑस्करविजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि हंस झिमर यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. दरम्यान, ट्रेलर आणि पोस्टर्स लवकरच भव्य पद्धतीने प्रदर्शित केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com