VIDEO: 'PM शाहबाज शरीफ सह 3.5 कोटी लोक मारले गेले असते...'; भारत-पाक युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक खुलासा!

Shehbaz Sharif Trump Disclosure: ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केवळ भारत-पाक संघर्षाचाच उल्लेख केला नाही, तर त्यांनी जगभरातील एकूण आठ युद्धे समाप्त केल्याचा मोठा दावा केला.
Shehbaz Sharif & Donald Trump
Shehbaz Sharif Trump DisclosureDainik Gomantak
Published on
Updated on

India Pakistan Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'स्टेट ऑफ द युनियन' या आपल्या महत्त्वाच्या भाषणात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षावर अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा केला. मंगळवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध जर त्यांनी थांबवले नसते, तर दोन्ही देशांमधील सुमारे 3.5 कोटी लोक मारले गेले असते.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केवळ भारत-पाक संघर्षाचाच उल्लेख केला नाही, तर त्यांनी जगभरातील एकूण आठ युद्धे समाप्त केल्याचा मोठा दावा केला. विशेष म्हणजे, या विधानादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्याशी झालेल्या संवादाचा संदर्भ देत खळबळ उडवून दिली.

Shehbaz Sharif & Donald Trump
India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वतः त्यांना सांगितले होते की, जर अमेरिकेने या संघर्षात वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. ट्रम्प म्हणाले की, "पाकिस्तानातील 3.5 कोटी जनतेचे असे म्हणणे होते की, जर मी हस्तक्षेप केला नसता तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचाही मृत्यू झाला असता." या विधानामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भारत आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये भीषण अणुयुद्ध पेटण्याची शक्यता होती, जी केवळ अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे टळली, असा ट्रम्प यांचा स्पष्ट रोख होता.

Shehbaz Sharif & Donald Trump
Iran-Pakistan Conflict: कारवाई करा अन्यथा...9 पाकिस्तानींच्या हत्येने हादरलेल्या पाकिस्तानचा इराणला अल्टिमेटम

या संघर्षाची पार्श्वभूमी पाहता, काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मोठा हल्ला केला होता, ज्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर भारताने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत 7 मे रोजी दहशतवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केले होते. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या अंतर्गत भागातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले होते.

या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने ड्रोन आणि यूसीएव्हीच्या माध्यमातून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीने (Air Defense System) पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले. या तणावपूर्ण काळातच ट्रम्प यांनी हस्तक्षेप केल्याचा दावा आता केला.

Shehbaz Sharif & Donald Trump
India vs Pakistan: 'अल्ला पाऊस पाड, 1 गुण मिळेल', पाकिस्तानी खेळाडूची देवाकडे प्रार्थना! मैदानात भिडण्यापूर्वीच पाकड्यांनी मानली हार

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या 10 महिन्यांच्या कार्यकाळात कंबोडिया आणि थायलंडसह अनेक ठिकाणचे संघर्ष मिटवल्याचे सांगितले. रशिया आणि युक्रेनमधील सुरु असलेल्या भीषण नरसंहारावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांचे प्रशासन हे युद्ध थांबवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. "जर मी राष्ट्राध्यक्ष असतो, तर रशिया-युक्रेन युद्ध कधीच सुरु झाले नसते," असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. इराणच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राजनैतिक तोडग्याला प्राधान्य असल्याचे म्हटले असले, तरी त्यांनी कारवाईचे सर्व पर्याय खुले ठेवल्याचे स्पष्ट केले. ट्रम्प यांचे हे संबोधन केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांवर जागतिक चर्चा घडवून आणणारे ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com