Taliban Attacks in Kandahar Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan War: तालिबान्यांचा कंधारवर कब्जा

विशेष म्हणजे अफगाणिस्तानमधील कंधार (Kandahar) हे दुसरे सर्वात मोठे शहर आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधून (Afghanistan) अमेरिकी (America) आणि नाटो सैन्यांनी माघार घेतल्यानंतर तालिबान (Taliban) आणि अफगाण सरकार (Afghan Government) यांच्यात युध्दजनक परिस्थिती निर्माण झाली. तालिबाने अफगाण सरकारला शह प्रतिशह देत शहरांवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता तालिबानला रोखण्यामध्ये अफगाण सेना अपयशी ठरत आहे. याच दरम्यान गुरुवारी तालिबानकडून दावा करण्यात आला आहे की, दक्षिणेकडे असलेल्या कंधार (Kandahar) शहरावर कब्जा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधील 34 प्रांतापैकी कंधार ही 12 वी राजधानी आहे. जी तालिबान्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतली आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमधील कंधार हे दुसरे सर्वात मोठे शहर आहे.

शिवाय, कंधारवर (Kandahar) तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाण अधिकारी आणि त्यांची टीम हवाई मार्गाने शहरातून निघून गेले. अफगाणिस्तानमधील हेरात शहरावर कब्जा करणे हे तालिबान्यांसाठी मोठे यश मानले जात आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील 34 प्रांतीय राजधान्यांपैकी आत्तापर्यंत 11 प्रांतीय राजधान्यांवर मागील आठवड्यापासून कब्जा केला आहे.

काबूलकडे जाणारा महामार्ग ताब्यात घेतला

बदाखशान प्रांताला ताजिकिस्तान, पाकिस्तान आणि चीनची सीमा आहे. अफगाणिस्तान सरकारला हा मोठा धक्का आहे. पुल-ए-खुमरी काबीज केल्यानंतर अफगाण सरकारची चिंता वाढली आहे. हे शहर ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने काबूलकडे जाणारा महामार्गही काबीज केला आहे. तालिबानला आता देशात इस्लामिक कायदे पूर्णपणे लागू करायचे आहेत. युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 11 प्रांतीय राजधान्यांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. तालिबानने काबूलला वीजपुरवठा करणारे काबूलच्या उत्तरेकडील क्षेत्र काबीज केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT