तालिबानची काबुलकडे वाटचाल; अफगाण सरकारची चिंता वाढतेय

Taliban ने पुल-ए-खुमरी काबीज केल्यानंतर अफगाण सरकारची चिंता वाढली आहे.
Taliban attacks in afghanistan
Taliban attacks in afghanistan Dainik Gomantak
Published on
Updated on

तालिबान दिवसेंदिवस अतिशय वेगाने अफगाणिस्तानवर कब्जा करताना दिसते आहे. राजधानी काबूलच्या दिशेने वाटचाल तालीबान सध्या वाटचाल करताना दिसतो आहे. तालीबानने सहा दिवसांत आठवी प्रांतीय राजधानी काबीज केली आहे. तालिबानने पुल-ए-खुमरी आणि फैजाबादचा ताबा घेतला आहे. पुल-ए-खुमरी काबूलपासून दोनशे वीस किलोमीटर दूर आहे. सहा प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी गेल्या 24 तासांत बागलाण प्रांताची राजधानी पुल-ए-खुमरी पूर्णपणे काबीज केली आहे. यानंतर तालीबानने बदाखशानची राजधानी फैजाबादही मिळवली.

काबूलकडे जाणारा महामार्ग ताब्यात घेतला

बदाखशान प्रांताला ताजिकिस्तान, पाकिस्तान आणि चीनची सीमा आहे. अफगाणिस्तान सरकारला हा मोठा धक्का आहे. पुल-ए-खुमरी काबीज केल्यानंतर अफगाण सरकारची चिंता वाढली आहे. हे शहर ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने काबूलकडे जाणारा महामार्गही काबीज केला आहे. तालिबानला आता देशात इस्लामिक कायदे पूर्णपणे लागू करायचे आहेत. युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 11 प्रांतीय राजधान्यांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. तालिबानने काबूलला वीजपुरवठा करणारे काबूलच्या उत्तरेकडील क्षेत्र काबीज केले आहेत.

Taliban attacks in afghanistan
अमेरिका आणि चीन पुन्हा आमने-सामने

कंधारमध्ये मोठा संघर्ष सुरू असुन याठीकाणी झालेल्या हवाई हल्ल्यात 10 दहशतवादी ठार झाले आहेत. कंधारमधील भीषण हिंसाचारामुळे 30 हजार कुटुंबांनी येथून स्थलांतर केले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी या शहरात पोहचल्यानंतर तालिबान्यांनी बाल्ख प्रांतातील मजार-ए-शरीफला घेरले. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा आणि राजकीय सल्लागार मोहम्मद मोहकिक होते. येथे अशरफ घनी यांनी सुरक्षेबाबत बैठकही घेतली. त्यात बाल्खचे राज्यपाल आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते. तर रशियन मीडियाने दावा केला आहे की, तालिबानने ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या सीमेवरील भाग पूर्णपणे ताब्यात घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com