हिंसा संपवण्यासाठी अफगाण सरकारची तालिबानला 'सत्तेची ऑफर'

Afghanistan: काबुलपासून फक्त 130 किलोमीटरवर असलेल्या गझनीवर देखील तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे.
Kabul gives power-sharing deal to Taliban to end violence
Kabul gives power-sharing deal to Taliban to end violenceDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तान (Afghanistan) सरकारच्या सल्लागारांनी दोहामध्ये शांतता चर्चेदरम्यान तालिबानला सत्ता वाटणीचा करार दिला आहे, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यचानंतर तालिबानने (Taliban) पुन्हा डोकं वर काढल्यानंतर देशातील हिंसा (Violence) आणि अशांतता संपवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. (Kabul gives power-sharing deal to Taliban to end violence)

"होय, सरकारने मध्यस्थ म्हणून कतारला प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावामुळे तालिबानला देशातील हिंसाचार थांबवण्याच्या बदल्यात सत्ता वाटून घेण्याची परवानगी मिळते," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात 10 प्रांतीय राजधान्यांवर तालिबानने कब्जा केला. तसेच काबुलपासून फक्त 130 किलोमीटरवर असलेल्या गझनीवर देखील तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. या शहरावर ताबा मिळवल्याने अफगाणिस्तानची राजधानी आणि देशाच्या दक्षिणेकडील प्रांतांना जोडणारा एक महत्वाचा महामार्ग तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याने राजधानीसोबतचा संपर्क तुटला आहे.

तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याने काबूल धोक्यात नसला तरी, गझनीच्या पराभवामुळे पुन्हा डोकं वर काढलेल्या तालिबानची पकड घट्ट झाली आहे, तालिबानने आतापर्यंत देशाच्या दोन तृतीयांश भुभागावर ताबा मिळवला असुन हजारो लोक आपली घरे सोडून पळून गेले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबान पुढच्या ३० दिवसांत काबुलवर ताबा मिळवण्याची शक्यता आङे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com