Pakistan Afghanistan Conflict Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानच्या एअरस्ट्राईकनंतर अफगाणिस्तानचा पलटवार; 55 पाक सैनिक ठार, 19 चौक्यांवर तालिबानचा ताबा VIDEO

Taliban Retaliation: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबुल, कंधार आणि पक्तिया या प्रमुख शहरांवर केलेल्या एअरस्ट्राईकचा बदला घेण्यासाठी तालिबान सरकारने अत्यंत कडक लष्करी कारवाई केली.

Manish Jadhav

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावाद आता एका भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबुल, कंधार आणि पक्तिया या प्रमुख शहरांवर केलेल्या एअरस्ट्राईकचा बदला घेण्यासाठी तालिबान सरकारने अत्यंत कडक लष्करी कारवाई केली. अफगाण सैन्याने केवळ सीमेवर गोळीबार केला नाही, तर चक्क पाकिस्तानी हद्दीत घुसून अनेक लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला असून पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला. या कारवाईमुळे ड्युरंड रेषेवर तणाव शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत.

अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या दाव्यानुसार, पाकिस्तानी सैन्य या हल्ल्यासाठी तयार नव्हते, ज्यामुळे 4 चौक्यांवरील सैनिक आपली शस्त्रे सोडून जीव वाचवण्यासाठी पळून गेले. ही कारवाई पाकिस्तानने (Pakistan) अफगाण सीमा ओलांडून केलेल्या हवाई हल्ल्याला आणि त्यामध्ये झालेल्या निरपराध नागरिकांच्या मृत्यूस दिलेले चोख उत्तर असल्याचे अफगाणिस्तानने म्हटले.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारीच्या रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास अफगाण सैन्याने पक्तिका, पक्तिया, खोस्त आणि नंगरहार यांसारख्या सीमावर्ती भागांतून पाकिस्तानवर एकाच वेळी हल्ला चढवला. अवघ्या 4 तास चाललेल्या या भीषण युद्धात अफगाण मुजाहिदीननी पाकिस्तानच्या 2 मोठ्या लष्करी तळांवर (गॅरीसन) आणि 19 सीमा चौक्यांवर पूर्णपणे ताबा मिळवला.

या रक्तरंजित संघर्षात पाकिस्तानचे 55 सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अफगाण सैन्य अनेक पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आपल्यासोबत घेऊन गेले असून काही सैनिकांना जिवंत बंदी बनवल्याचेही वृत्त समोर येत आहे. या हल्ल्यादरम्यान अफगाण सैन्याने पाकिस्तानचा एक रणगाडा उद्ध्वस्त केला आणि मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे, दारुगोळा आणि एक लष्करी वाहने आपल्या ताब्यात घेतले.

हा संघर्ष इतका तीव्र होता की, पाकिस्तानच्या लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले. अखेर रात्री 12 वाजता अफगाण लष्कराच्या 'चीफ ऑफ स्टाफ'च्या आदेशानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. पाकिस्तानच्या एअरस्ट्राईकचा असा भीषण बदला घेतला जाईल याची कल्पना पाकिस्तानी लष्कराला नव्हती, ज्यामुळे आता संपूर्ण सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT