नवी दिल्ली: भारतासह (India) सर्व देश अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी (AIRLIFT) सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तालिबानने 15 ऑगस्ट 2021 रोजी काबूल ताब्यात घेण्यापूर्वीच भारताने तेथून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली होती. भारताने सर्वप्रथम काबूलमधील दूतावासातील कर्मचाऱ्यांना (Embassy staff) परत बोलावले होते. यानंतर, तेथे अडकलेल्या नागरिकांना हळूहळू हवाई दलाचे विमान (Air Force aircraft) सी -17 ग्लोबल (C-17 Global) मास्टरने परत आणले.
आता भारताने व्यावसायिक उड्डाणेही सुरू केली आहेत. भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानातून आपल्या एक हजाराहून अधिक नागरिकांना बाहेर काढले आहे. आता भारतातील काही मोजकेच नागरिक अफगाणिस्तानात आहेत. त्यापैकी बहुतेक नागरिक काबुलपासून खूप दूर राहत आहेत. अशा काही नागरिकांनी अफगाणिस्तानातील गुरुद्वारांमध्ये आश्रय घेतला आहे.
भारताने रविवारी हवाई दलाच्या तीन विमानांनी काबूलमधून सुमारे 382 लोकांना परत आणले. यापैकी सुमारे 329 भारतीय नागरिक होते. या दरम्यान, लोकांना आणण्यासाठी C-17 ग्लोबल मास्टर, आणि C-130J विमानांची मदत घेण्यात आली आहे. ग्लोबल मास्टरमधून सुमारे 168 लोकांना भारतात आणण्यात आले. यामध्ये 107 भारतीयांसह 23 अफगाण शीख आणि हिंदूंचा समावेश होता. 87 भारतीय नागरिकांव्यतिरिक्त, दोन नेपाळी नागरिकांना विशेष एअर इंडिया विमानाद्वारे भारतात आणण्यात आले. त्याचप्रमाणे काबुलहून अमेरिकन विमानाने दोहा येथे आणलेल्या 35 भारतीय नागरिकांनाही भारतात आणण्यात आले आहे.
काबूल विमानतळाची सुरक्षा सध्या अमेरिकन लष्कर करत आहे. अमेरिकन विमानेही तेथून आपल्या नागरिकांना आणि त्यांच्या सैनिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. रविवारी अमेरिकेने आपल्या 169 नागरिकांना तेथून बाहेर काढले आहे. असे असूनही, तेथे अजूनही मोठ्या संख्येने अमेरिकन नागरिक आहेत. याबाबत माहिती देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले, त्यांचे हजारो नागरिक अफगाणिस्तानातून परतण्याची वाट पाहत आहेत. आपल्या शेवटच्या नागरिकाला सुखरूप परत आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अफगाणिस्तानातील आपले लोक आणि सैनिकांच्या सुरक्षित परताव्यासाठी अमेरिकेने आपले काही अतिरिक्त सैनिक तेथे पाठवले होते.
जर्मनीने आपल्या दोन H145Ms हेलिकॉप्टर्ससह काबुलला स्पेशलाइज्ड कमांडो फोर्सचे जवानही पाठवले आहेत. या व्यतिरिक्त, ब्रिटन आणि फ्रान्सने देखील आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी विमाने पाठविली आहेत. जेणेकरून लोकांना शक्य तितक्या लवकर तेथून सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. जर्मनीने अफगाण नागरिकांना निर्वासितांचा दर्जा जाहीर केला आहे. जर्मनीचे A400M मालवाहू विमान काबूलमधून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्नात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.