Leave afghanistan: अफगाणिस्तान सोडा, मायदेशी परता! भारत सरकारचे आवाहन

Security Alert: भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना अफगाणिस्तान सोडून वेळेत मायदेशी परतण्यास सांगितले आहे.
Indian government has appealed to Indian nationals to leave Afghanistan
Indian government has appealed to Indian nationals to leave Afghanistan Dainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानातील चौथे सर्वात मोठे शहर मजार-ए-शरीफ ताब्यात घेण्यावरून तीव्र संघर्ष सुरू झाला आहे. तालिबान्यांनी शहराला चारही बाजूंनी घेरल्यानंतर भारत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व नागरिकांना तातडीने अफगाणिस्तान सोडण्यास सांगितले आहे. भारताने मजार-ए-शरीफच्या वाणिज्य दूतावासातील सर्व मुत्सद्दी, कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक विशेष विमानही पाठवले आहे. (Indian government has appealed to Indian nationals to leave Afghanistan)

भारताने अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना अफगाणिस्तान सोडून वेळेत मायदेशी परतण्यास सांगितले आहे. काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानहून उड्डाणे थांबण्यापूर्वी परत येण्यास सांगितले आहे. अफगाणिस्तानमध्ये मीडिया कव्हरेज करणाऱ्या भारतीय पत्रकारांना दूतावासाच्या सतत संपर्कात राहण्यास सांगितले आहे.

Indian government has appealed to Indian nationals to leave Afghanistan
पाकिस्तानवर बंदी घाला म्हणत जगभरातून भारताला पाठिंबा

तालिबान्यांनी मजार-ए-शरीफला चारही बाजूंनी घेरल्यानंतर, वाणिज्य दूतावासाने नागरिकांना त्यांना बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे, शहराच्या परिसरात असलेले सर्व भारतीयांनी विशेष विमानाने नवी दिल्ली गाठण्यासाठी संपर्क साधाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. वाणिज्य दूतावासाने यासाठी दूरध्वनी क्रमांक देखील प्रसिद्ध केले आहेत. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, सध्या 1500 भारतीय नागरिक अफगाणिस्तानमध्ये आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com