Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

Ayman Al-Zawahiri वरील हल्ल्यात हक्कानी कुटुंबातील सदस्य ठार, अफगाण राजदूताचा दावा

Ayman Al-Zawahiri Attack: अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला.

दैनिक गोमन्तक

Ayman Al-Zawahiri Attack: अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला. या हल्ल्यात हक्कानीच्या कुटुंबातील अल कायदाचे निकटवर्तीय सदस्यही मारले गेल्याचा दावा आता केला जात आहे. हा दावा खुद्द ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानचे राजदूत मोहम्मद झहीर अघाबर यांनी केला आहे. 2 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात हक्कानीच्या कुटुंबीयातील सदस्यांचाही मृत्यू झाला, असे अघाबर यांनी म्हटले आहे. हक्कानी नेटवर्क ही जलालुद्दीन हक्कानीने स्थापन केलेली इस्लामिक दहशतवादी संघटना आहे. सोव्हिएत विरोधी युद्धात जलालुद्दीन बंडखोर कमांडर म्हणून उदयास आल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, इंडिया टुडेशी बोलताना राजदूत मोहम्मद झहीर अघाबर म्हणाले, "काबूलमधून (Kabul) मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात हक्कानी कुटुंबातील काही सदस्य मारले गेले. हे घर हक्कानीचेच होते. हल्ल्यानंतर बाकीचे लोक काबूल सोडून गेले."

दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजदूताचा दावा अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, 'ड्रोन हल्ल्यात हक्कानी कुटुंबातील कोणीही मारले गेले नाही. अल-जवाहिरीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दुखापत झाली नाही.'

तसेच, लष्करी कारवाईत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, असेही बायडन यांनी म्हटले होते. "हे मिशन काळजीपूर्वक नियोजित केले गेले,'' असेही बायडन शेवटी म्हणाले होते.

शिवाय, अफगाण राजदूतांच्या म्हणण्यानुसार, सिराजुद्दीन हक्कानी आणि इतर प्रमुख नेते काबूलमधील सुरक्षित घरे सोडून गेले आहेत. ते पुढे म्हणाले की, 'अफगाणिस्तानात अजूनही अनेक दहशतवादी गट आहेत. अफगाणिस्तानच्या लोकांसाठी अयमान अल-जवाहिरीची हत्या महत्त्वाची नाही. आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तालिबानच्या (Taliban) आश्रयाखाली अफगाणिस्तानात दहशतवाद वाढत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT