Abducted citizens in Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: मानवाधिकारांची एैशी तैशी!पाकिस्तानात अपहरण झालेल्या नागरिकांची संख्या तीन हजारांच्या पुढे

Ashutosh Masgaunde

According to the Defense of Human Rights (DHR) report, the number of abducted citizens in Pakistan has reached 3120 by 2023:

पाकिस्तानातील मानवाधिकारांची स्थिती कोणापासून लपलेली नाही. आता एका अहवालाने पाकिस्तानला पुन्हा आरसा दाखवला आहे. खरे तर पाकिस्तानमध्ये अपहरण झालेल्या नागरिकांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे.

डिफेन्स ऑफ ह्युमन राइट्स (DHR) च्या अहवालात ही बाब समोर आली आहे. डिफेन्स ऑफ ह्युमन राइट्स ही एक एनजीओ आहे. जी पाकिस्तानमध्ये अपहरण झालेल्या नागरिकांची माहिती गोळा करते.

या संस्थेने नुकताच आपला अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार 2023 पर्यंत पाकिस्तानमध्ये अपहरण झालेल्या नागरिकांची संख्या 3120 वर पोहोचली आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने या अहवालाचा दाखला देत म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 3,120 लोकांना जबरदस्तीने बेपत्ता करण्यात आले आहे. नुकत्याच आलेल्या या अहवालात 2023 मध्ये 51 लोक बेपत्ता झाल्याचे म्हटले आहे. यासह ही संख्या 3,120 झाली आहे.

बेपत्ता व्यक्तींच्या 120 कुटुंबांना मदत देण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. याशिवाय विविध न्यायालयात आठ नवीन खटले दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आतापर्यंत फक्त एकाच प्रकरणाचा निकाल लागला आहे.

बेपत्ता लोकांच्या प्रकरणी न्यायालयाकडून आदेश जारी करण्यात आले होते, मात्र असे असूनही अद्यापही लोकांची सुटका झालेली नाही, असेही या अहवालात स्पष्ट झाले आहे. अ

हवालात म्हटले आहे की, एनजीओने अलीकडेच 69 बेपत्ता बलूच विद्यार्थ्यांची प्रकरणे उच्च न्यायालयासमोर मांडली होती, त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर कठोर टिप्पणी दिली आणि सरकारला तसे करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, गृह आणि मानवाधिकार मंत्री म्हणाले की, 22 विद्यार्थ्यांचा शोध लागला आहे, तर 28 अद्याप बेपत्ता आहेत.

मात्र, न्यायालयाने असंतोष व्यक्त केला आणि प्रकरणांची तातडीने दखल न घेतल्यास गृहमंत्री आणि पंतप्रधानांवर संभाव्य कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

याशिवाय, न्यायालयाने पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, परंतु न्यायालयाच्या आदेशांचे पालन झाले नाही आणि कुटुंबांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तानात जबरदस्तीने बेपत्ता होण्याचे सुमारे 10,000 गुन्हे दाखल झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT