Israel-Hamas War: ''गाझामध्ये राहणारा प्रत्येकजण दहशतवादी, मी नरकातून सुटले...'', हमासच्या तावडीतून सुटलेल्या मियाचा खुलासा

Israel-Hamas War: 'गाझामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती दहशतवादी आहे...' हमासच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या मिया स्केम (Mia Schem)चे असे म्हणणे आहे.
Hostage Mia Schem
Hostage Mia SchemDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: 'गाझामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती दहशतवादी आहे...' हमासच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या मिया स्केम (Mia Schem)चे असे म्हणणे आहे. 21 वर्षीय मियाने हमासच्या कैदेत असतानाचा अनुभव कथन केला. 7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला तेव्हा मिया एका संगीत महोत्सवात होती. इथे हल्ल्यादरम्यान तिला गोळी लागली. त्यानंतर गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आले. 54 दिवसांनंतर 30 नोव्हेंबर रोजी हमासने तिची सुटका केली. सुटका झाल्यानंतर तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. गाझामध्ये ओलीस ठेवल्याबद्दल ती म्हणाली की, ती नरकातून बाहेर आली आहे.

मियाच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, तिला गंभीर आघात आणि झोप न लागल्यामुळे मिर्गीचा आजार झाला आहे. चॅनल 12 आणि चॅनल 13 या दोन्ही सोबत ती धक्कादायक खुलाशांबद्दल बोलली. ती पुढे म्हणाले की, 'गाझामध्ये राहणाऱ्या लोकांची खरी गोष्ट जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ते खरोखर कोण आहेत आणि ती तिथे काय करत होती हे सांगणे तिच्यासाठी महत्त्वाचे आहे. ती पुढे असेही म्हणाले की, 'मी नरक अनुभवला आहे. गाझामधील प्रत्येकजण दहशतवादी आहे. एकही निष्पाप नागरिक नाही.'

Hostage Mia Schem
Israel-Hamas War: ''मुस्लिम देश फेल ठरले, PM मोदीच...'', जामा मशीदीचे इमाम बुखारी म्हणाले

हमासने तिच्यावर गोळी झाडली

मियाने 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या अपहरणाच्या पहिल्या क्षणांचे वर्णन करताना सांगितले की, जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा ती आणि तिचे मित्र कारकडे धावले. ती गाडी चालवत होती, पण हमासच्या दहशतवाद्यांनी कारच्या टायरवर गोळी झाडली आणि ती थांबली. तिने पुढे सांगितले की, 'त्यानंतर दहशतवाद्यांनी भरलेला ट्रक तिच्या शेजारी पोहोचला. यातून हमासच्या एका दहशतवाद्याने तिच्याकडे पाहून अगदी जवळून गोळी झाडली. गोळी लागल्याने ती जमिनीवर पडली आणि सर्वत्र रक्त पसरले.''

मरण्याचे नाटक केले

मियाने पुढे सांगितले की, 'तिच्या डोळ्यांसमोर हमासच्या दहशतवाद्यांनी तिचा मित्र एलिया टोलेडोनोला ओलीस ठेवले. या महिन्याच्या सुरुवातीला आयडीएफने एलियाचा मृतदेह जप्त केला आणि परत इस्रायलला आणला.' मियाने पुढे सांगितले की, ''जो कोणी जखमी झाला होता त्याला हमासकडून मारले जात होते, ज्यामुळे तिने मरण्याचे नाटक केले. तिच्या मित्राची गाडी जळत होती. जवळ एक व्यक्ती येत होता, ज्याला तिने इस्रायली समजले आणि मदत मागितली, पण तो हमासचा दहशतवादी निघाला. त्याने तिला उभे राहण्यास सांगितले. नंतर तो तिला अयोग्यरित्या स्पर्श करु लागला.''

Hostage Mia Schem
Israel-Hamas War: ''हिंसा हा कोणत्याही हिंसेवर...'' इस्रायली तरुणांची सैन्यात भरती होण्यास नापसंती; इस्रायल करतयं जबरदस्ती

मुलांना द्वेष करायला शिकवतात

गाझाला जाताना ती अर्धी बेशुद्ध पडल्याचे मियाने सांगितले. काय होत आहे याची तिला कल्पना नव्हती. ती पुढे म्हणाले की, 'जेव्हा आम्ही गाझामध्ये पोहोचलो तेव्हा एका दहशतवाद्याने माझे केस ओढले आणि मला हॉस्पिटलच्या खोलीत फेकले. त्याने माझ्या जखमेवर प्लास्टिकची पट्टी बांधली आणि मी तीन दिवस तशीच राहिलो.' ती पुढे म्हणाले की, ''तीन दिवसांनंतर भूल न देता तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गाझामध्ये कोणीही निर्दोष नाही. तेथील सर्व कुटुंबे हमाससाठी काम करतात. मुले जन्माला येताच ते त्यांना शिकवतात की इस्रायल पॅलेस्टाईन आहे आणि ज्यूंचा द्वेष करा.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com