Crime Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तानात कट्टरवाद्यांची क्रूरता; श्रीलंकन​नागरिकाची केली हत्या

श्रीलंकन नागरिक प्रियंता कुमारा (Priyanta Kumara) येथून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील एका कारखान्यात महाव्यवस्थापक म्हणून काम करत होता.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये (Sialkot) कट्टरवाद्यांच्या जमावाने कथित ईशनिंदा केल्याच्या आरोपावरुन एका श्रीलंकन नागरिकाची बेदम मारहाण करुन हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळला. या घटनेची अधिक माहिती देताना पंजाब पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, श्रीलंकन नागरिक प्रियंता कुमारा (Priyanta Kumara) येथून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील एका कारखान्यात महाव्यवस्थापक म्हणून काम करत होता.

कुमाराने कथितरित्या कट्टरपंथी तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) चे पोस्टर फाडले ज्यामध्ये कुराणातील श्लोक लिहिलेले होते. पोस्टर फाडल्यानंतर त्यांनी ते डस्टबिनमध्ये फेकले. कुमाराच्या कार्यालयाला लागून असलेल्या भिंतीवर इस्लामिक पक्षाचे पोस्टर लावण्यात आले होते. कारखान्यातील काही कामगारांनी त्याला पोस्टर काढून टाकताना पाहिले होते. निंदेच्या घटनेमुळे संतप्त झालेले शेकडो लोक आजूबाजूच्या परिसरातून कारखान्याबाहेर जमा होऊ लागले. त्यापैकी बहुतेक टीएलपी कार्यकर्ते आणि समर्थक होते.

शरीरावर अनेक जखमा झाल्याने श्रीलंकन नागरिकाचा मृत्यू झाला

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जमावाने संशयिताला ( Sri Lankan citizens) कारखान्यातून खेचून नेले आणि त्याला काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर शरीरावर अनेक जखमा झाल्याने त्यांने जीव सोडला. पोलिस तिथे पोहोचण्यापूर्वीच जमावाने त्यांचा मृतदेह जाळला. या घटनेबाबत इंटरनेट मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात शेकडो लोक श्रीलंकन नागरिकाच्या मृतदेहाभोवती जमलेले दिसत आहेत, ते सर्व TLP घोषणा देत आहेत.

या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

सियालकोटचे जिल्हा पोलीस अधिकारी उमर सईद मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की, श्रीलंकन नागरिकाची हत्या झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, घटनेची प्रत्येक बाजूने चौकशी झाली पाहिजे

पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे म्हटले असून पोलीस महानिरीक्षकांना या प्रकरणाची चौकशी करुन 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी करुन अहवाल सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

शिवाय, या घटनेनंतर सर्व कारखाने बंद असताना परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT