तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा जिवंत आहे की मेला? अखेर मिळाले उत्तर

तालिबानने (Taliban) सत्ता आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर त्यांचा सर्वोच्च नेता जगासमोर येईल, असा विश्वास अखुंदजादाबद्दल व्यक्त करण्यात येत होता.
Hibatullah Akhundzada
Hibatullah AkhundzadaDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) सत्तेवर आल्यापासून सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही. तालिबानने सत्ता आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर त्यांचा सर्वोच्च नेता जगासमोर येईल, असा विश्वास अखुंदजादाबद्दल व्यक्त करण्यात येत होता. परंतु आतापर्यंत तसे झालेले नाही. तालिबानचा नेता मेला की, जिवंत आहे याबाबत अफगाण जनतेला कोणतीही माहिती नाही. तालिबानचे नेतृत्व कोण करत आहे याबद्दल शंका आहे.

दरम्यान, एएफपी या वृत्तसंस्थेने अखुंदजादाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. 30 ऑक्टोबर रोजी अशी अफवा पसरली होती की, अखुंदजादाने दक्षिणेकडील कंदाहार शहरातील एका मदरशात संबोधित केले होते. तालिबानी अधिकार्‍यांनी हकीमिया मदरशात सर्वोच्च नेत्याच्या उपस्थितीवर सत्यतेचा शिक्कामोर्तब झाला आहे. 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ चालणारे ऑडिओ रेकॉर्डिंग रिलीज करण्यात आले.

Hibatullah Akhundzada
तालिबानचा अफगाणिस्तान हत्यारांच्या ब्लॅक मार्केटवर अखेर पडदा

मदरशातील उपस्थित लोकांनी अखुंदजादाबद्दल असे सांगितले

मदरसाचे सुरक्षा प्रमुख मासूम शकरुल्ला यांनी सांगितले की, सर्वोच्च नेत्याने मदरशाला भेट दिली तेव्हा ते सशस्त्र होते आणि त्यांच्यासोबत तीन सुरक्षा रक्षकही होते. मोबाईल फोन आणि साउंड रिकॉडर्सला परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मोहम्मद नावाच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले की, "आम्ही सर्वजण त्यांच्याकडे बघत होतो आणि फक्त नि फक्त रडत होतो." तो निश्चितच अखुंदजादा होता याची पुष्टी करता येईल का असे विचारले असता, मोहम्मद म्हणाला, मी आणि माझ्या सोबत असणारे इतके आनंदित झाले की आम्ही त्याचा चेहरा पाहणेच विसरलो. मोहम्मद मुसा या 13 वर्षीय विद्यार्थ्याने अखुंदजादाला सांगितले की, तो हुबेहूब तालिबानने प्रसिद्ध केलेल्या फोटोतील व्यक्तीसारखा दिसतोय.

त्यामुळे तालिबानी नेते लो प्रोफाइल राहतात

खरे तर तालिबानी नेत्यांच्या लो प्रोफाईलमागील मुख्य कारण म्हणजे मारले जाण्याची भीती. अमेरिका अनेकदा ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून दहशतवाद्यांशी सामना करत आहे. अशाच एका ड्रोन हल्ल्यात 2016 मध्ये तत्कालीन तालिबान नेता मुल्ला अख्तर मन्सूर (Mullah Akhtar Mansour) मारला गेला होता. त्यानंतरच अखुंदजादा तालिबानच्या सर्वोच्च पदावर आला. त्याला लवकरच अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरीचा पाठिंबा मिळाला. तालिबानने पाच वर्षांपूर्वी अखुंदजादाचा एक फोटो जारी केला होता, त्यानंतर त्यांचा एकही नवीन फोटो जारी करण्यात आलेला नाही.

Hibatullah Akhundzada
अफगाणिस्तान क्रिकेट कार्यक्रमांबाबत तालिबानचा फर्मान जारी

अखुंदजादा आत्मघातकी हल्ल्यात ठार झाला

पदच्युत अफगाण राजवटीचे अधिकारी आणि अनेक पाश्चात्य विश्लेषकांना विश्वास आहे की, अखुंदजादाचा मृत्यू वर्षांपूर्वीच झाला होता. त्याला जिवंत पाहण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आले आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा 2013 मध्ये मृत्यू झाला तेव्हा तालिबानने यापूर्वी असे केले आहे. मात्र त्याला दोन वर्षे जिवंत दाखवण्यात आले. अखुंदजादा स्वतः मरण पावला होता आणि काबूल ताब्यात घेण्यापूर्वी त्याची कोणतीही भूमिका नव्हती, असे एका माजी सरकारी सुरक्षा अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले. सुमारे तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानातील क्वेटा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात तो त्याच्या भावासह ठार झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com