Crime Dainik Gomantak
ग्लोबल

'धक्कादायक' हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू

आफ्रिकन देश असणाऱ्या सेनेगलमधून (Senegal) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

आफ्रिकन देश असणाऱ्या सेनेगलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेनेगलमधल्या हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेबद्दल, सेनेगलचे अध्यक्ष मॅकी सॅल यांनी बुधवारी उशिरा सांगितले की, पश्चिम सेनेगल शहरातील तिवौने येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पश्चिम आफ्रिकन देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. (A fire at a hospital in Senegal has killed 11 newborns)

दरम्यान, सेनेगलमध्ये मध्यरात्रीच्या आधी, अध्यक्ष मॅकी सॅल यांनी ट्विटच्या माध्यमातून जाहीर केले की, आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "मला नुकतीच सार्वजनिक रुग्णालयातील (Hospital) नवजात शिशु विभागात लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली." ते पुढे म्हणाले, "नवजात बालकांच्या मातांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो."

काही दिवसांपूर्वी या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले

सेनेगाली नेते डिओप साय यांच्या म्हणण्यानुसार, आगीची दुर्घटना तिवौनेच्या ट्रान्सपोर्ट हबमधील मामे अब्दु अजीज सी दबाख हॉस्पिटलमध्ये घडली. ती "शॉर्ट सर्किट" मुळे घडली. ते पुढे म्हणाले की, रुग्णालयात आग वेगाने पसरली.

दुसरीकडे, शहराचे महापौर डेम्बा डिओप यांनी सांगितले की, रुग्णालयात आग लागल्यानंतर तीन नवजतांना वाचवण्यात आले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच मामे अब्दू अजीज साई दबाख हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते.

गेल्या महिन्यात रुग्णालयात 4 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता

अशीच एक घटना गेल्या महिन्यात उत्तरेकडील लिंगुर शहरात एप्रिलच्या उत्तरार्धात घडली, जेव्हा रुग्णालयात आग लागली आणि त्या घटनेत चार नवजात बालकांचा मृत्यू झाला. सिझेरियन ऑपरेशनसाठी व्यर्थ वाट पाहत असलेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण देश हादरवून सोडल्यानंतर, बुधवारी ही नवीन घटना घडली.

एप्रिलच्या सुरुवातीला, वायव्येकडील लुगा शहरातील सार्वजनिक रुग्णालयात गर्भवती महिलेने ऑपरेशनची वाट पाहिली. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने सेनेगलच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या खराब स्थितीबद्दल देशभरात आक्रोश निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT