अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा बंदूकींची संख्या जास्त

एकाच वर्षात 45,222 लोकांनी गमावला जीव
Texas Gun Firing
Texas Gun FiringDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील टेक्सास शहरात अमेरिकेला हादरा देणारी घटना 25 मे रोजी घडली आहे. गेल्या दहा दिवसात ही घडलेली दुसरी घटना आहे. या घटनेत 18 वर्षीय तरुणाने शाळेत घुसून केलेल्या गोळीबारात 18 मुलांसह एकूण 21 जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बोलताना राष्ट्रपती झाल्यानंतर असं भाषण करावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. अशी हतबलता ही व्यक्त केली होती. तसेच आपल्याला यावर ठोस पावले उचलावी लागतील असे ही ते यावेळी म्हणाले होते. (The United States has more gun owners than the population )

जगातील सर्वात जुन्या लोकशाहीच्या देशात शस्त्रांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या इतक्या घटना घडतात, शाळेच्या मुलांच्या हातातही लोडेड गन्स येतात. इतक्या घटना घडल्या तरी त्या देशात शस्त्रास्त्रांच्या वापरावर नियंत्रणे येत नाहीत हे विशेष. खरेतर शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर नियंत्रण येऊ नये, त्यांची विक्री वाढत रहावी यासाठी अमेरिकेमध्ये मोठी लॉबी कार्यरत आहे.

Texas Gun Firing
इम्रान खान यांच्या समर्थकांनी इस्लामाबादमधील मेट्रो स्टेशनला लावली आग

लोकसंख्येपेक्षा बंदुकींची संख्या जास्त

अमेरिकेतील एकूण लायसन्स असलेल्या बंदुकींची संख्या ही 39 कोटी (2018) इतकी आहे. तर अमेरिकेची लोकसंख्या ही 33 कोटी (2018) इतकी आहे. गन व्हॉयलन्समुळे अमेरिकेचे झालेले आर्थिक नुकसान- 280 अब्ज डॉलर्स (22 लाख कोटी) वार्षिक आहे. अमेरिकेमध्ये सातत्याने होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे रोजच्या वैद्यकीय उपचारांवर होणारा खर्च मोठा आहे. गोळीबारामुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी अमेरिकन करदात्यांना रोज जवळपास 271 कोटी रुपयांचा भूर्दंड बसतो. यामध्ये फर्स्ट रिस्पॉन्स, अॅम्ब्युलन्स, उपचार, पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेचा समावेश होतो.

Texas Gun Firing
Afghan Blast: मजार-ए-शरीफ शहरात तीन मिनीबसमध्ये बॉम्बस्फोट, 9 जण ठार

गन व्हॉयलन्समुळे बळी पडणारे कुटुंबांचे आर्थिक नुकसान- एका कुटुंबामागे तब्बल 36 कोटी रुपयांचे नुकसान होतं. त्यामध्ये मेडिकल बिल्स आणि मेंटल हेल्थ सपोर्टचा समावेश होतो. अमेरिकेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यामागे उत्पादन आणि महसुलाचा विचार करता 11 कोटी रुपये इतकं नुकसान होतं. तर प्रत्येक नागरिकाचे जवळपास 67,000 रुपये इतकं नुकसान होतं.

अमेरिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदुका बाळगण्याची परवानगी का ?

अमेरिकन संविधानातील दुसऱ्या घटना दुरुस्तीमध्ये राईट टू बीअर आर्म्स म्हणजे शस्त्रास्त्र जवळ बाळगण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला देण्यात आला आहे. अमेरिकन नागरिकाला स्वत:च्या संरक्षणासाठी जवळ बंदुक बाळगण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच प्रत्येक राज्याचे स्वत:चे गन लॉज म्हणजे बंदुका बाळगण्याविषयी कायदे आहेत. त्यातही डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या संबंधीचे कायदे अधिक उदार असल्याचं दिसून येतंय.

अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटनेमुळे एकाच वर्षात तब्बल 45,222 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2020 सालच्या एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. यामध्येही सरासरी पाहता दर दिवशी अमेरिकेमध्ये 124 लोकांना गोळीबारामुळे जीव गमवावा लागतो. दर तासाचा विचार करता अमेरिकेत 5 लोकांना गोळीबारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

गोळीबारामध्ये मृत झालेल्या एकूण संख्येपैकी 54 टक्के लोकांनी आत्महत्या केली आहे. ही संख्या 24,292 इतकी आहे. तसेच 43 टक्के म्हणजे 19,384 इतक्या लोकांची हत्या झाली आहे. 2020 साली झालेल्या 45,222 इतके मृत्यू हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षातील आकडेवारी ही मोठी आहे. बराक ओबामा यांनी ही त्यांच्या कार्यकाळात गन व्हायलन्स संपावा, शस्त्रास्त्र विक्रीवर नियंत्रण यावं यासाठी प्रयत्न केले. मात्र ते अयशस्वी ठरले त्यांनी त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत यावर कोणतेही भाष्य केलं न्हवतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com