Bill Gates Girlfriend | Paula Hurd  Dainik Gomantak
ग्लोबल

Bill Gates Girlfriend: 67 वर्षांचे बिल गेट्स प्रेमात; जाणून घ्या बिल यांची गर्लफ्रेंड पॉला हर्डविषयी...

ओरॅकल कंपनीच्या दिवंगत सीईओंची पत्नी आहे पॉला

Akshay Nirmale

Bill Gates Girlfriend: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत! 67 वर्षीय बिल गेट्स सध्या पॉला हर्डला डेट करत आहेत. पॉला 60 वर्षांची असून ती ओरॅकल कंपनीचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांची पत्नी आहे.

रिपोर्ट्सनुसार, दोघेही जवळपास एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. पीपल या नियतकालिकातील वृत्तानुसार लोकांना बऱ्याच काळापासून या दोघांच्या डेटिंगची माहिती आहे. दरम्यन, पॉला आत्तापर्यंत बिल यांच्या मुलांना भेटलेली नाही.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दिसले होते एकत्र

पॉला हर्ड आणि बिल गेट्स गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील सामन्यावेळी एकत्र दिसले होते. यापूर्वी मार्च 2022 मध्येही दोघांचा एकमेकांसोबतचा फोटो समोर आला होता. दोघांनीही बरेच दिवस आपले नाते जगाच्या नजरेपासून लपवून ठेवले होते.

बिल गेट्स यांनी 2021 मध्ये मेलिंडा गेट्स यांना घटस्फोट दिला आणि त्यांचे 27 वर्ष जुने वैवाहिक जीवन संपुष्टात आणले. दोघांनी ऑगस्ट 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांना तीन मुले आहेत. जेनिफर गेट्स, फिबी गेट्स आणि रोरी गेट्स.

कोण आहे पॉला हर्ड?

पॉला हर्ड या ओरॅकलचे माजी अध्यक्ष मार्क हर्ड यांची पत्नी आहे. ३० वर्षे पॉला आणि मार्क एकत्र होते. लग्नाच्या ३० वर्षानंतर मार्क यांचे २०१९ मध्ये निधन झाले. पॉला हर्ड यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्या एनसीआर (नॅशनल कॅश रजिस्टर) नावाच्या कंपनीत काम करतात. त्यांना कॅथरीन आणि केली नावाच्या दोन मुली आहेत.

मुलांना देणार केवळ 10 अब्ज डॉलर

बिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी वॉशिंग्टन, यूएसए येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. 1975 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी स्थापन केली. सन 2000 नंतर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

गेट्स यांनी जाहीर केले आहे की ते त्यांच्या मुलांना फक्त 10 अब्ज डॉलर देतील आणि उर्वरित संपत्ती देणगी म्हणून दाण करतील. गेट्स यांची एकूण संपत्ती 105.9 अब्ज डॉलर इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

SCROLL FOR NEXT