Jobs in India: गुड न्यूज! इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात 2030 पर्यंत मिळणार 'इतक्या' कोटी नोकऱ्या...

भारतात एका वर्षात इलेक्ट्रिक विक्रीत तिप्पट वाढ; 8 वर्षांत वाहन संख्या 1 कोटींवर जाणार
Jobs in India
Jobs in IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Jobs in Electric Vehicle Sector: सध्या जगभरात मंदीसदृश्य स्थितीमुळे कर्मचारी कपात होत असलेली दिसते. जायंट टेक कंपन्यांपासून ते ईकॉमर्स, सोशल मीडिया, एंटरटेन्मेंट उद्योगात कर्मचारी कपातीचे लोन पसरले आहे.

त्यामुळे रोजगारांबाबत एकीकडे निराशाजनक वातावरण होत असतानाच नोकऱ्यांबाबत एक गुड न्यूजही समोर आली आहे. त्यानुसार आगामी 7 वर्षात ईलेक्ट्रीक वाहन उद्योगात कोट्यवधी नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

Jobs in India
Twitter Blue Subscription: ट्विटरने भारतात सुरू केले ब्लू सबस्क्रिप्शन, जाणून घ्या किती रूपये द्यावे लागणार...

2022 मध्ये देशातील ईव्ही (Electric Vehicle) विक्रीचा आकडा 10 लाखांवर पोहोचला आहे. 2021 च्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट आहे.

नुकत्याच झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात, सरकारने सन 2030 पर्यंत देशातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या १ कोटींचा आकडा पार करेल, तसेच त्याच्याशी संबंधित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांची संख्या देखील ५ कोटींहून जास्त असेल, असा अंदाज व्यक्त केला होता.

ईव्ही आणि हायरिंग सेक्टरशी संबंधित तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ईव्ही सेक्टर देशातील नोकऱ्यांचे प्रमुख स्त्रोत बनू शकते.

नवीन कौशल्यांची आवश्यकता

सरकारचा प्रयत्न आहे की 2030 पर्यंत एकूण वाहन विक्रीमध्ये ईव्हीचा वाटा 30% असावा. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मूळ उपकरणे उत्पादक आणि घटक कंपन्यांची एक एकोसिस्टिम तयार होईल. त्याच्याशी संबंधित क्षेत्रातही लाखो नवीन कौशल्ये लागतील.

Jobs in India
Turkey-Syria Earthquake: मृतांचा आकडा 15,000 वर... ढिगाऱ्याखाली अजूनही शोध सुरू

या नोकऱ्या मिळतील...

केमिकल सायंटिस्ट, मटेरियल इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, डेव्हलपमेंट इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, कमर्शियल डिझायनर, सॉफ्टवेयर डेव्हलपर, सॉफ्टवेयर इंजिनियर, मशिन लर्निंग, एआय, मॅन्युफॅक्चरिंग, इक्विपमेंट असेम्बलर, मशिन टूल ऑपरेटर, मेंटनन्स मेकॅनिक, टेक्निशियन, इन्फ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिशियन, पॉवरलाईन इन्स्टॉलर

भारतात 10 वर्षांत ईव्ही उद्योग 80.71% दराने वाढला आहे. 2013 मध्ये भारतात फक्त 2,693 इलेक्ट्रिक वाहने विकली गेली. 2022 मध्ये हा आकडा 9,99,949 पर्यंत वाढला. म्हणजेच, या कालावधीत, ईव्ही विक्री सरासरी वार्षिक 80.71% दराने वाढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com