Popular Front of India: भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा PFI चा कट

महाराष्ट्र एटीएसचे आरोपपत्र; हिंदुत्ववादी संघटनांचे अस्तित्व मिटविण्याचाही उल्लेख
PFI Plan
PFI PlanDainik Gomantak
Published on
Updated on

Popular Front of India: देशात बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेचे देशाविरोधातील एक षडयंत्र उघडकीस आले आहे. PFI कडून देशाविरोधात धोकादायक कट रचला जात होता. 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा हा प्लॅन होता. संघटनेच्या कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे.

PFI च्या या प्लॅनमध्ये भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी 4 टप्प्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार पीएफआय राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदू संघटनांना नष्ट करण्याचाही कट रचत होती. महाराष्ट्र एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे.

PFI Plan
Jobs in India: गुड न्यूज! इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात 2030 पर्यंत मिळणार 'इतक्या' कोटी नोकऱ्या...

एटीएसने आरोपी मजहर मन्सूर खानच्या फोनवरून 'इंडिया 2047 टूवर्ड्स रुल ऑफ इस्लाम इन इंडिया' नावाच्या पुस्तकाचा मसुदा जप्त केला आहे. हा महत्त्वाचा दस्तऐवज असून तो प्रसिद्ध करू नये, असे या पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या पुस्तकात इस्लामिक राष्ट्र निर्मितीची रूपरेषा ठरवली होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे. यासोबतच काश्मीर आणि लक्षद्वीपमध्ये राहणार्‍या मुस्लिमांनाही यात सहभागी करून घेण्याचे नियोजन होते. येथील आठ जिल्ह्यात 70 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे.

रा. स्व. संघाच्या नेत्यांवर लक्ष

पीएफआयने त्यांच्या सदस्यांना घरात अॅसिड आणि शस्त्रे ठेवण्यास सांगितले होते. कामगारांना चाकू, कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणि इतर अनेक हत्यारे घरात ठेवण्यास सांगितले होते. PFI देशातील वातावरण बिघडवण्याचा कट रचत होती, असेही आरोपपत्रात म्हटले आहे. आरएसएसच्या अनेक नेत्यांवर पीएफआयच्या लोकांची नजर होती.

PFI Plan
India-Pakistan Trade: सीमेवर संघर्ष, पण व्यापारात नफा; भारत-पाकिस्तान व्यापाराची आकडेवारी घ्या जाणून...

इस्लामिक देशांकडून निधी मिळवून देशातील पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा, देशात हिंसाचार पसरवण्याचा पीएफआयचा डाव होता. एससी, एसटी आणि भटक्या विमुक्त आदिवासींचा पाठिंबा मिळवण्याचेही नियोजन होते.

गुप्त बैठका

एटीएसने 27 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत आणि एजन्सीने अटक केलेल्या पाच आरोपींच्या ठिकाणाहून कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक डेटा आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी जप्त केल्या. पाचही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

पीएफआय सदस्यांनी महाराष्ट्रातील चेंबूर, धारावी, कुर्ला, ठाणे, नेरुळ, पनवेल आणि मुंब्रा येथे गुप्त बैठका घेतल्या होत्या, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com