Foreign Minister S. Jayashankar
Foreign Minister S. Jayashankar Dainik Gomantak
ग्लोबल

United Nation: संयुक्त राष्ट्रपरिषदेत काय म्हणाले भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

दैनिक गोमन्तक

United Nation: संयुक्त राष्ट्रपरिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी भाषण करताना काही महत्वाचे मुद्दे मांडले होते. आता हे भाषण चर्चेत आहे. पुढील काळात काय बदल झाले पाहिजेत ,जग कशाप्रकारे बदल झाले आहेत याविषयी ते बोलले आहेत. पाहुयात जयशंकर यांच्या भाषणातील महत्वाचे पाच मुद्दे

१.सुधारणांवर वाद-विवाद लक्षहीन झाले आहेत. जग पूर्णत :बदललेले आहे. आपण हे आर्थिक समृद्धी ,विकासात्मक प्रगती आणि राजनैतिक प्रभावाच्या संदर्भात पाहू शकतो.

२.कोव्हीड महामारीदरम्यान अनेक देशांनी पारंपारिक मार्ग सोडत कोव्हीड लस आपापल्या देशांना लस उपलब्ध करुन दिली होती. खरे तर वैश्विक उत्पादन व्यवस्थेत झालेले बदल पाहू शकतो.पूर्वीची व्यवस्था पूर्णपणे बदलताना दिसत आहे.

३.मोठ्या संकटांनी विश्वस्तरावर शक्तीशाली संघटना असणे किती महत्वाचे आहे हे अधोरेखित केले आहे. अन्नधान्य,इंधन क्षेत्रातल्या मोठ्या परिषदांनी यावर पुरेसे प्रतिनिधित्व न केल्यामुळे अनेक देशांनी या परिषदा आपल्या हिताचे नाही असे मानले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मजबूत संघटना असणे गरजेचे आहे.

४.आंतकवादाच्या मुद्द्यावर अनेक देशांनी एकत्र येऊनदेखील आतंकवादाला खरे दाखवण्यासाठी आणि त्याची रक्षा करण्यासाठी मोठ्या मंचाचा दुरुपयोग केला जातो.

५.आपल्याला फक्त हितधारकांची संख्या वाढवणे गरजेचे नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेत आणि वैश्विक जनमतात प्रभाव निर्माण करणे ,त्यांचा विश्वास वाढवणे गरजेचे आहे. ही संकल्पना राबवायची असेल तर संयुक्त राष्ट्रसंघात ( United Nation ) लॅटीन अमेरिका,आफ्रिका आणि आशियातील देशांचे सातत्याने प्रतिनिधित्व असणे गरजेचे आहे. त्यांच्या भविष्याचे निर्णय त्यांच्या सहभागाशिवाय घेतले जाऊ शकत नाहीत.

एस.जयशंकर यांच्या भाषणाने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

Tiswadi Agriculture : नेवरा खाजन शेतजमिनीत पुन्हा नदीचे खारे पाणी; शेतीला चालना देण्याचे पोकळ दावे

आपण नागरिक म्हणून मतदान करणार का ?

शिरगावच्या जत्रेत प्रगटलेली क्रांतिज्योत

बारावंश

SCROLL FOR NEXT