Kala Academy: नाट्यगृह व्यवस्थापकाचे नाटक स्पर्धेत कसे? दबक्या आवाजात चर्चा; संबंधित कर्मचारी करणार खुलासे सादर

Kala Academy Drama Result Dispute: सुशांत नायक यांचे नाटक स्पर्धेत असतानाही ते नाट्यगृह व्यवस्थापकपदी कसे राहिले, अशी खुमासदार चर्चा नाट्यवर्तुळात सध्या सुरू आहे.
kala academy drama competition result dispute
kala academy drama competition result disputeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सुशांत नायक यांचे नाटक स्पर्धेत असतानाही ते नाट्यगृह व्यवस्थापकपदी कसे राहिले, अशी खुमासदार चर्चा नाट्यवर्तुळात सध्या सुरू आहे.

एखादी व्यक्ती स्पर्धकांशी संबंधित असेल तर स्पर्धा आयोजकांशी संबंधित म्हणून ती वावरू शकत नाही, हा साधा नियम असताना नायक यांना तसे करण्यास दिलेली मुभा आणि नंतर निकाल फिरविण्याचा झालेला प्रयत्न, या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची चर्चा कला अकादमी परिसरात कानावर पडत होती. सुशांत नायक हे कला व संस्कृती खात्याचे कर्मचारी असून ते प्रतिनियुक्तीवर कला अकादमीत नाट्यगृह व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.

कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्य स्पर्धेचा निकाल फिरविण्याचा प्रकार झाल्याच्या आरोपप्रकरणी कला अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गावकर आणि नाट्यगृह व्यवस्थापक सुशांत नायक यांना खुलासा द्यावा लागणार आहे. कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर यांनी जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसीत २४ तासांची मुदत देण्यात आली आहे.

kala academy drama competition result dispute
Kala Academy: कलेच्या दरबारात लाचेचा बाजार! दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; प्रकरण दडपण्यासाठी 'अकादमी'तच रंगली होती चर्चा

गावकर यांना (शुक्रवारी) सकाळी नोटीस मिळाली, तर नायक हे दिल्ली येथे असल्याने त्यांना नोटीस प्रत्यक्ष मिळू शकलेली नाही. तरीही त्यांना डिजिटल स्वरूपात नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

kala academy drama competition result dispute
Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

संचालनालयाच्या उत्तराचीही प्रतीक्षा

कला अकादमीतील नाट्यस्पर्धेचा निकाल बदलण्यासाठी झालेल्या प्रयत्नांबाबत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालकांकडून काय माहिती येते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ‘गोमन्तक’मधील वृत्तामध्ये या संचालकांसमोर सारा प्रकार घडल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे यात नेमके सत्य काय, अशी विचारणा करणारे पत्र कला अकादमीकडून काल संचालनालयाला पाठविले आहे. त्याचेही उत्तर उद्यापर्यंत अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com