India-China Border Clash: अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैनिकांमधील चकमक चिंतेची बाब असून आंतरराष्ट्रीय सीमांचे उल्लंघन केले जाऊ नये, असे जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमॅन यांनी म्हटले आहे. एकरमॅन यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अॅनालेना बायरबॉक यांच्या भारत दौऱ्यानंतर चीन आणि रशियाच्या मुद्द्यावर भारत आणि जर्मनीने सर्वोच्च पातळीवर संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे, असेही एकरमॅन म्हणाले.
आम्ही चीनवर अधिक अवलंबून आहोत: जर्मनी
भारत (India) आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कराराबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'जर्मनीला या एफटीएची गरज आहे. यामुळे भारताप्रती आपले व्यापारी संबंध पूर्णपणे बदलतील. सध्या आपण चीनवर (China) अधिक अवलंबून आहोत. इतर देशांशीही व्यापार वाढवावा लागेल. दुर्दैवाने, भारताला ज्या पातळीवर प्राधान्य मिळायला हवे त्याच पातळीवर मिळत नाही.'
ते पुढे म्हणाले की, 'लोकसंख्या आणि इतर बाबींच्या दृष्टिकोनातून भारताशिवाय चीनशी स्पर्धा करु शकेल असा कोणताही देश नाही. लोक अजूनही व्हिएतनाम आणि मलेशियाकडे पाहतात. मला माहित नाही की, ते असे का करतात? कदाचित यामागे भारतातील संरक्षणवादी वातावरण आणि नियमांशी संबंधित समस्या असू शकतात.'
तवांग संघर्षाबद्दल चिंतित: एकरमॅन
दुसरीकडे, तवांग संघर्षाबाबत ते म्हणाले की, 'माझ्याकडे याबाबत पूर्ण माहिती नाही. पण आम्ही यासंबंधी चिंतीत आहोत. आंतरराष्ट्रीय सीमेवर कधीही उल्लंघन होता कामा नये.' ते पुढे म्हणाले की, "युरोपमधील या रशियन आक्रमणाला आम्ही दररोज युद्धाचे स्वरुप म्हणून पाहतो. ते पुढे म्हणाले की, 'माझ्याकडे तवांग चकमकीबाबत पूर्ण माहिती नाही. मात्र तिथे सातत्याने चकमकी होत आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य देशांमध्ये हिंसाचार होत होता पण आता तो पूर्वेकडील देशांमध्येही होत आहे. त्याची चिंता आहे. हिंसा होऊ नये.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.